वानवडीतील रस्त्यांवर सीसीटीव्हीद्वारे पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:09+5:302021-05-16T04:11:09+5:30

वानवडी परिसरात एकूण ३७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मागील वर्षभरात जवळपास ६ ते ७ गुन्ह्यांच्या तपासात या कॅमेऱ्यांच्या ...

Police surveillance on Wanwadi roads through CCTV | वानवडीतील रस्त्यांवर सीसीटीव्हीद्वारे पोलिसांची नजर

वानवडीतील रस्त्यांवर सीसीटीव्हीद्वारे पोलिसांची नजर

Next

वानवडी परिसरात एकूण ३७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मागील वर्षभरात जवळपास ६ ते ७ गुन्ह्यांच्या तपासात या कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हेगारांना पकडण्यात यश आले आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये जमावबंदी असताना नियम तोडणाऱ्यांवर नजर ठेवून प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कारवाई करता येत आहे, असे वानवडी पोलिसांकडून सांगण्यात आले.

प्रभाग २५ चे लोकप्रतिनिधी प्रशांत जगताप व रत्नप्रभा जगताप यांच्या पालिकेच्या विकासनिधीमधून पोलीसांच्या सहकार्याने वानवडीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वानवडी बाजार पोलीस चौकीत या सीसीटीव्हींचे युनिट असून पंधरा दिवसाची माहिती संकलीत करून ठेवता येते. सध्या सर्व सीसीटीव्ही सुरू असल्याचे वानवडी बाजार पोलीस चौकीकडून सांगण्यात आले.

फोटो : रस्त्यांवर कॅमेऱ्याची नजर.

Web Title: Police surveillance on Wanwadi roads through CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.