नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई, खेड पोलीस स्टेशन अंतर्गत २७ लाख ५४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:10 AM2021-05-12T04:10:34+5:302021-05-12T04:10:34+5:30
खेड तालुका करोनाचे हॉटस्पॉट बनला असून, तालुक्यात आतापर्यंत साडेबावीस हजारांच्या वर कोरोनाबाधित व्यक्ती झाल्या आहेत. प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी मोठ्या ...
खेड तालुका करोनाचे हॉटस्पॉट बनला असून, तालुक्यात आतापर्यंत साडेबावीस हजारांच्या वर कोरोनाबाधित व्यक्ती झाल्या आहेत. प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केली जात असतानाही नागरिक मात्र शासनाचे नियम मोडत आहेत त्यामुळे संसर्ग वाढत आहे. लॉकडाऊन असूनही विनाकारण नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. सकाळी अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवली जातात, मात्र त्यात सोशल डिस्टन्स आणि मास्कबरोबर नियमावलीचे उल्लंघन करीत आहेत. तालुक्यात बाधित व्यक्तींची संख्या वाढत आहे. मात्र नागरिक बेदखल राहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मास्क न लावणे, गर्दी करणे, दुकानात सोशल डिस्टन्स न ठेवणे, विनाकारण गावभर फिरणे यावर निर्बंध घालण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेत दंडात्मक कारवाई केली जात आहे. खेड पोलीस ठाण्यांतर्गत अंतर्गत २३४५ जणांवर न्यायालयात खटले भरण्यात आले आहेत. त्यापैकी ३० जणांना खेड न्यायालयाने प्रत्येकी १ हजार रुपये दंड केला आहे. करोना संक्रमण काळात आतापर्यंत पोलिसांनी ९,६९२ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यापोटी जवळपास २७ लाख ५४ लाख ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईत खेड पोलीस स्टेशन जिल्ह्यात पुढे आहे. ५७ आस्थापना वर दंडात्मक कारवाई करून ५७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.१० आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. लग्न समारंभात गर्दी करणाऱ्या ७ मंगलकार्यालयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २२ हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून ५५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
फोटो ओळ: विनाकारण फिरणाऱ्यावरती पोलिस कडक भूमिका घेत दंडात्मक कारवाई करीत आहे.