बॉम्ब आढळल्याने खळबळ, पोलीस पथकाने घेतला ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:51 AM2018-03-16T00:51:58+5:302018-03-16T00:51:58+5:30

कोंढवा खुर्द येथील पालिका विकसित करत असलेल्या उद्यानामध्ये गुरुवारी दुपारी हँड ग्रेनेड सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

The police team took possession of the bomb, after the bomb found | बॉम्ब आढळल्याने खळबळ, पोलीस पथकाने घेतला ताबा

बॉम्ब आढळल्याने खळबळ, पोलीस पथकाने घेतला ताबा

Next

पुणे : कोंढवा खुर्द येथील पालिका विकसित करत असलेल्या उद्यानामध्ये गुरुवारी दुपारी हँड ग्रेनेड सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विकसित होत असलेल्या या उद्यानाजवळ मोठमोठ्या सोसायट्या असल्याने या बॉम्बमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उंड्री-एनआयबीएम रस्त्यावर कोणार्क इंद्रायू सोसायटीजवळ असलेल्या उद्यानात ही घटना घडली आहे. उभा सोसायटीच्या अमेनिटी स्पेसवर पालिकेतर्फे नवीन उद्यान विकसित केले जात आहे. या ठिकाणी त्याबाबतचे ठिकठिकाणी माती टाकण्याचे काम काही कामगार नेहमी प्रमाणे करीत होते.
बुधवारी सायंकाळी परवीन शेख या त्यांच्या मुलांना उद्यानात फिरण्यासाठी घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मुलांना हा बॉम्ब झाडावर ठेवलेला दिसला. त्यांच्या मुलांनी ही घटना घरी गेल्यावर त्यांना सांगितली. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, परंतु जेव्हा मुलांनी त्यांना त्यावर वस्तूवर काहीतरी लिहिले आहे, असे सांगितले तेव्हा त्यांनी नगरसेविका नंदा लोणकर यांना याबाबत कल्पना दिली. नगरसेवक नंदा लोणकर यांनी याबाबत कोंढवा पोलिसांना कळविले. कोंढवा पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले व त्यांनी हा बॉम्ब ताब्यात घेतला. उद्यान व परिसरात अजून काही बॉम्ब आहेत की नाही याची खात्री बॉम्ब शोधक पथकाने श्वानाच्या मदतीने केली, परंतु त्यांना काही आढळले नाही. हा जिवंत बॉम्ब असल्याचे कळत आहे, नागरिकांच्या जागरूकतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली आहे.

Web Title: The police team took possession of the bomb, after the bomb found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.