शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By admin | Published: June 19, 2017 05:26 AM2017-06-19T05:26:26+5:302017-06-19T05:26:26+5:30
संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी शहरामध्ये साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त होता.
पुणे : संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी शहरामध्ये साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त होता. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शहरातील पालखी मार्गावर तसेच या मार्गाकडे येणाऱ्या अन्य रस्त्यांवरही पोलीस तैनात होते.
आठ पोलीस उपायुक्त या बंदोबस्तामध्ये नेमण्यात आले असून स्वत: पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम या बंदोबस्तावर लक्ष ठेवून होत्या. दोन्ही पालख्यांसोबत राज्य राखीव पोलीस दलाची प्रत्येकी एक तुकडी होती.
पालख्यांचा मुक्काम पुण्यात सोमवारी राहणार आहे. मंगळवारी दोन्ही पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्तान होईल. शहरामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसमवेतच पुणेकरही या पालखी सोहळ्यात मोठ्या भक्तिभावाने सामील होतात. विशेषत: पालख्यांचे इंजिनिअरिंग कॉलेजजवळ आगमन झाल्यावर संभाव्य गर्दी, वाहतूक व्यवस्था, घातपाती कारवाया यावर लक्ष केंद्रित केलेले साध्या वेशातील, वर्दीतील पोलीस ऊऊदक्ष झाले होते. पालख्यांच्या आगमनापासून हडपसर येथून पालख्या ग्रामीण हद्दीत जाईपर्यंत बंदोबस्त असणार आहे.