भोंदूबाबाला रंगेहाथ पकडले, खेड शिवापूर येथे पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:16 AM2017-08-24T04:16:25+5:302017-08-24T04:16:27+5:30
भोंदूगिरी आणि जादूटोणा करून सामान्यांकडून पैसे उकळून फसवणूक करणाºया खेड-शिवापूर येथील भोंदूबाबाला अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे.
नसरापूर : भोंदूगिरी आणि जादूटोणा करून सामान्यांकडून पैसे उकळून फसवणूक करणाºया खेड-शिवापूर येथील भोंदूबाबाला अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आज खेड-शिवापूर पोलीस चौकीत जादूटोणा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून या सय्यद रुहुल अमिन ऊर्फ भंडारी बाबा या भोंदूबाबास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खेड-शिवापूर पोलीस स्टेशनला हडपसर तरवडेवस्ती येथील जितेंद्र दशरथ साळुंके यांनी तक्रार दिली आहे. तरवडे यांनी प्रापंचिक व व्यवसायात येणाºया अडचणींमुळे निराशेपोटी शिवापूर येथील दर्ग्यावर जात असत.
त्यावेळी त्यांना शिवापूर येथील भंडारी बाबा यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी तरवडे त्याच्याकडे जाऊन त्यांना होत असलेल्या अडचणी त्यांनी सदर भोंदूबाबास सांगितल्या.
त्याने त्यांच्या सर्व अडचणी दूर करतो, असे सांगत तुझ्यावर करणी केलेली आहे. त्याचा उपाय करण्याचे नाटक करून चार हजार रुपये घेतले. त्यानंतर या बाबाने त्यांची करणी काढली, असे सांगितले. तरी त्यांच्या अडचणी काही दूर झाल्या नव्हत्या. त्यावेळी तरवडे हे त्या भोंदूबाबाकडे पुन्हा जाऊन मला काही फरक पडला नाही. माझे पैसे मला परत करा, असे सांगितल्यावर या बाबाने त्यांना शिवीगाळ केली.
येथे पुन्हा परत यायचे नाही, असे सांगत हाकलुन दिले. त्यांनी नंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्याच्या पुढाकारातून तक्रार केली आहे.
- याप्रकरणी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख आदी कार्यकर्त्यांनी याबाबत पाठपुरावा करून या भोंदूबाबाची खेड-शिवापूर पोलीस चौकीत तक्रार केली आहे. या प्रकरणी खेड-शिवापूर पोलिसांनी या भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे तपास करीत आहेत.