मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणाऱ्या स्वाभिमनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पाेलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 12:25 PM2019-01-10T12:25:40+5:302019-01-10T12:28:33+5:30
मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाेलिसांनी घेतले ताब्यात
पुणे : पुण्यातील बालेवाडी येथील क्रिडा संकुलात खेलाे इंडिया युथ गेम्सच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन चार तासांनी साेडून दिले.
दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी, एक रकमी एफ आरपी देण्यात यावी, महापाेर्टलद्वारे भरती न करता एम पी एस सी द्वारे भरती करावी तसेत शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी फी परवडत नसेल तर शिक्षण साेडून दे या केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच जाेरदार घाेषणाबाजी केली. पाेलिसांनी तात्काळ परिषदेचे कार्यकर्ते अमाेल हिप्परगे, प्रवीण भाेसले, शर्मिला येवले, साैरभ वळवडे यांना ताब्यात घेतले. त्यांना हिंजवडी पाेलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना समज देऊन साेडून देण्यात आले.
हिप्परगे म्हणाले, आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही मुख्यमंत्र्याचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच विनाेद तावडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी आमची मागणी आहे. यावेळी पाेलिसांनी आम्हाला काहीवळे ताब्यात घेऊन साेडून दिले.