संशयावरुन पाठलाग करणाऱ्या पोलिसांना सापडले 3 खुनी; मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 10:23 AM2019-09-20T10:23:34+5:302019-09-20T10:24:56+5:30

पोलीस नाईक संदीप सुरेश देवकर हे त्यांच्याबरोबर २ होमगार्ड यांना घेऊन थेऊर गाव येथे रात्री गस्त घालत होते. पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास त्यांना वाघोलीकडून थेऊरकडे चार जण एकाच मोटारसायकलवरुन जाताना दिसले

Police trace suspects found 3 murderers; Attempts to dispose of a corpse | संशयावरुन पाठलाग करणाऱ्या पोलिसांना सापडले 3 खुनी; मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

संशयावरुन पाठलाग करणाऱ्या पोलिसांना सापडले 3 खुनी; मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

Next

पुणे : संगमवाडी येथील एका तरुणाचा दगडाने ठेचून खुन करुन त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाणाऱ्या तिघा जणांना लोणी काळभोर पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. हा प्रकार वाघोलीकडून थेऊरकडे जाणाऱ्या रोडवर पहाटे पावणेचार वाजता घडला. लोणी काळभोर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

अशोक संतोष आडवाणी (वय २२, रा. पिंपरी), अक्षय दिलीप पवार (वय १९, रा. वरवंड, दौंड) आणि विजय संतोष पवार (वय १९ रा. वरवंड, दौंड) अशी त्यांची नावे आहेत. तर भारत राजू बढे (वय २४,रा़ कासारवाडी) असे खुन करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या दक्षतेमुळे खुनाची माहिती मिळण्यापूर्वीच आरोपी पकडले गेले. जर हे आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात यशस्वी झाले असते तर पोलिसांना त्याचा छडा लावणे मुश्किल झाले असते. मृतदेहाची ओळख पटविण्यापासून त्यांच्या खुन्यांपर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांना जिकीरीचा तपास करावा लागला असता.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पोलीस नाईक संदीप सुरेश देवकर हे त्यांच्याबरोबर २ होमगार्ड यांना घेऊन थेऊर गाव येथे रात्री गस्त घालत होते. पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास त्यांना वाघोलीकडून थेऊरकडे चार जण एकाच मोटारसायकलवरुन जाताना दिसले. त्यांच्यातील एकाच्या डोक्यावर प्लास्टिक गोणी झाकली होती व अंगावर रक्ताचे डाग असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांना शंका आल्याने त्यांनी पाठलाग करण्यास सुरुवात केली. पोलीस पाठलाग करत असल्याचे दिसल्यावर त्यांनी थेऊर फाटा येथे गोणीत झाकलेल्यास रस्त्याच्या बाजूला टाकून ते यवतच्या दिशेने पळून जाऊ लागले. देवकर यांनी होमगार्डांबरोबर त्यांचा पाठलाग करुन तिघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी भारत बढे यांचा खुन करुन त्याच्या मृतदेहाची निर्जनस्थळी विल्हेवाट लावण्यासाठी ते घेऊन जात असल्याचे सांगितले. लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Police trace suspects found 3 murderers; Attempts to dispose of a corpse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.