पोलीस सेवानिवृत्तीनंतरच्या विविध समस्या मार्गी लावणार : संपतराव जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:12 AM2021-02-15T04:12:10+5:302021-02-15T04:12:10+5:30
शेलपिंपळगाव : कोरोना महामारीच्या संसर्गजन्य रोगाचे संकट असूनदेखील संघटनेच्या वतीने सेवानिवृत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सातव्या वेतन, संगणक ...
शेलपिंपळगाव : कोरोना महामारीच्या संसर्गजन्य रोगाचे संकट असूनदेखील संघटनेच्या वतीने सेवानिवृत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सातव्या वेतन, संगणक परीक्षा, समाधान हेल्पलाईनचा प्रश्न, पोलीस हवालदार यांचा शंभर रुपये ग्रेड पे, पेन्शन व सेवानिवृत्तीनंतरच्या रकमांबाबत, सेवापट पडताळणीचा प्रश्न आदी प्रश्नाबाबत वर्दीतील देवमाणूस सेवानिवृत्तीनंतर विविध समस्यांच्या विळख्यात असून, संघटनेचे पदाधिकारी पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या शासनदरबारी पाठपुराव्याबाबतची माहिती राज्याचे सचिव संपतराव जाधव यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत पोलीस कल्याणकारी असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सभा संपन्न झाली. याप्रसंगी पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे, पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष संतोष गजभिव, उपाध्यक्ष नाळे, संघटनेचे सभासद भगत आदी उपस्थित होते.
उत्तर पुणे जिल्ह्यातील संघटनेचे कामकाज पाहून तसेच सेवानिवृत्त पोलीस बांधवासाठी राज्याचे अध्यक्ष धनंजय जाधव यांचे नेतृत्वाखाली ३५ सेवानिवृत्त अधिकारी पोलिसांना संघटनेचे सभासदत्व देण्यात आले. या वेळी सभासदांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणेबाबत उपाययोजना तयार करणेत आली. या वेळी खेड तालुक्यातील सेवानिवृत्त अधिकारी पोलिस कर्मचाऱ्यांची नवीन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. तालुका अध्यक्षपदी विष्णू शिंदे, उपाध्यक्ष गुनाजी काटे, सचिवपदी विजय आदक, खजिनदार मिलिंद भालेराव, सल्लागारपदी विठ्ठलराव मुळे, प्रकाश ढेंबे, दत्तू टाकळकर यांची निवड करण्यात आली.
फोटो ओळ : खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सभेवेळी उपस्थित मान्यवर.