Pune: हृदयविकाराच्या झटक्याने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, चाकणमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 12:58 PM2024-01-12T12:58:59+5:302024-01-12T13:00:42+5:30
राठोड यांनी सिंधुदुर्ग येथे यापूर्वी सेवा केली होती. पाच वर्षांपासून ते चाकण येथे चाकण शहर बीट सांभाळत होते....
चाकण (पुणे) : येथील पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले सहायक फौजदार बाबूराव मानसिंग राठोड (वय ५०) यांचा ब्रेन हॅमरेज (मेंदूतील रक्तस्राव) झाल्याने, तसेच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.
चाकणपोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी हे दिलेल्या माहितीनुसार, राठोड हे सोमवारी (ता. ८) रात्री ड्युटीवर असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना चाकण येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना प्रथमदर्शनी हार्ट अटॅक व ब्रेन हॅमरेज झाला आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांचा सोमवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
राठोड यांचे मूळ गाव सोलापूर येथील उद्धवनगर (विजापूर रस्ता) आहे. त्यांच्या मागे एक पाच वर्षांचा मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे. राठोड यांनी सिंधुदुर्ग येथे यापूर्वी सेवा केली होती. पाच वर्षांपासून ते चाकण येथे चाकण शहर बीट सांभाळत होते.