सुरक्षारक्षकांना पोलिसांचा ‘लूक’
By admin | Published: May 5, 2015 03:08 AM2015-05-05T03:08:59+5:302015-05-05T03:08:59+5:30
खाकी गणवेश त्यावर निळ्या रंगाची स्काऊटसारखी गोल टोपी अशा पोशाखातील महापालिकेतील सुरक्षारक्षकांचा गणवेश आता बदलला आहे.
मंगेश पांडे, पिंपरी
खाकी गणवेश त्यावर निळ्या रंगाची स्काऊटसारखी गोल टोपी अशा पोशाखातील महापालिकेतील सुरक्षारक्षकांचा गणवेश आता बदलला आहे. त्यांना आता गोल टोपीऐवजी पोलिसांच्या टोपीसारखीच लाल-निळी टोपी (फटिक कॅप) देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा ‘लूक’ बदलला असून सुरक्षारक्षक आता पोलीस भासू लागले आहेत. १ मे महाराष्ट्र दिनापासून या टोपीचा वापर सुरू करण्यात आला आहे.
सुरक्षिततेसाठी महापालिका भवनासह प्रभाग कार्यालय, सभागृह, जलउपसा केंद्र, वायसीएम रुग्णालय आदी ठिकाणीही २९९ सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले आहेत. दरम्यान, विविध कारणांनी महापालिका मुख्यालय परिसरात येणारे मोर्चे, आंदोलने, आयुक्तांना घेराव अशा वेळी तणावाची परिस्थिती निर्माण होते. सुरक्षारक्षक असूनही त्यांना जुमानले जात नाही. मात्र, त्याचवेळी पोलीस त्या ठिकाणी दाखल झाल्यास परिस्थिती नियंत्रणात येते. त्यामुळे आता यापुढे पोलिसांच्या गणवेशातीलच सुरक्षारक्षक असल्याने परिस्थिती नियंत्रणात येईल.
टोकाच्या टोपीचा रंग पोलिसांच्या टोपीप्रमाणे निळा व लाल आहे. यासह खाकी पोशाख आणि हातात वॉकीटॉकी यामुळे सुरक्षारक्षक पोलिसांप्रमाणेच दिसत आहेत.