जिल्ह्यात ४ लाख ६९ हजार बालकांना पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:03+5:302021-02-05T05:00:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पोलियोमुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात रविवारी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जवळपास ४ लाख ६९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलियोमुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात रविवारी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जवळपास ४ लाख ६९ हजार ४३३ बालकांना लस पाजण्यात आली. या वर्षी ४ लाख ८१ हजार ६१७ बालकांना लस पाजण्याचे उद्दिष्ट होते. ९६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिली.
जिल्हा पोलिओमुक्त करण्यासाठी १ ते ५ वर्षांच्या बालकांना पोलिओ लस पाजण्यात येते. ही मोहीम रविवारी जिल्ह्यात राबवण्यात आली. यासाठी जिल्ह्यात ३ हजार ६०१ बूथ उभारण्यात आले होते. यासोबतच फिरते पथक आणि ट्रॅझिट पथकाची तैनात करण्यात आले होते. काेरोनाच्या पार्श्वभूमीवर या केंद्रावर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. पालकांना मास्क तसेच सॅनिटायझर बंधनकारक होते. निर्जंतुकीकरणासाठी केंद्राबाहेर सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. या वर्षी जिल्ह्यातील ४ लाख ८१ हजार ६१७ बालकांना लस पाजण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाचे होते. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात ही लस पोहोचवण्यात आली होती. लसीकरणासाठी ८ हजार ७४४ कर्मचारी तैनात होते. सकाळपासूनच मुलांना लस देण्यासाठी केंद्राबाहेर पालकांनी रांगा लावल्या होत्या. संध्याकाळपर्यंत बूथवर पाच वर्षांखालील ४ लाख ४० हजार ३२६ बालकांना लस पाजण्यात आली. तर ट्रॅझिट पथकाने ११ हजार ७०० मुलांना लस पाजली. फिरत्या पथकाने १२ हजार ११६ बालकांना लस पाजली.
चौकट
लसीकरणासाठी ३० हजार ३३६ डोस केंद्रावर वितरीत करण्यात आले होते. यातील २५ हजार ४२५ डोस बालकांना पाजण्यात आले. यातील ३ हजार ६९ डोस शिल्लक राहिले तर १ हजार ८३२ डोस हे अर्धवट शिल्लक राहिले.