डोर्लेवाडीच्या विकासासाठी राजकीय मतभेद विसरले जातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:45+5:302021-09-22T04:12:45+5:30

डोर्लेवाडी : डोर्लेवाडी हे गाव नेहमी चांगले काम करणाऱ्यांचा नेहमी सन्मान करते. सामाजिक कामे करत असताना आपापसातील ...

Political differences are forgotten for the development of Dorlewadi | डोर्लेवाडीच्या विकासासाठी राजकीय मतभेद विसरले जातात

डोर्लेवाडीच्या विकासासाठी राजकीय मतभेद विसरले जातात

Next

डोर्लेवाडी : डोर्लेवाडी हे गाव नेहमी चांगले काम करणाऱ्यांचा नेहमी सन्मान करते. सामाजिक कामे करत असताना आपापसातील राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याचा या गावचा आदर्श प्रेरणादायी आहे. त्यामुळे या गावचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे, असे प्रतिपादन बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.

डोर्लेवाडी (ता. बारामती) राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्हा अधीक्षक संतोष झगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, आयर्नमॅन दशरथ जाधव, बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून गायत्री लॉन्स येथे नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बारामती पंचायत समितीचे माजी सभापती अशोक नवले, छत्रपती साखर कारखाना माजी संचालक रमेश मोरे, पंचायत समितीचे सदस्य राहुल झारगड, सरपंच पांडुरंग सरवदे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काळोखे, रामभाऊ बनकर, संदीप नाळे, खरेदी - विक्री संघ संचालक भगवान क्षीरसागर, छत्रपती कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष नेवसे, कांतिलाल नाळे, कृष्णात जाधव झारगडवाडीचे सरपंच नितीन शेडगे, कांतिलाल काळकुटे, भीमराव मदने आदी उपस्थित होते.

————————————————

फोटो ओळी : राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्हा अधीक्षक संतोष झगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, आयर्नमॅन दशरथ जाधव, बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

२१०९२०२१-बारामती-०६

Web Title: Political differences are forgotten for the development of Dorlewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.