श्रेयवादावरून शाळेत राजकारण पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:12 AM2021-03-31T04:12:34+5:302021-03-31T04:12:34+5:30

खोर : विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाव्दारे ज्या शाळेने राज्यभर लौकिक कमविला त्याच देऊळगाव गाडा येथील विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेतील स्वागतकमानीवरील ...

Politics ignited in the school over credit | श्रेयवादावरून शाळेत राजकारण पेटले

श्रेयवादावरून शाळेत राजकारण पेटले

Next

खोर : विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाव्दारे ज्या शाळेने राज्यभर लौकिक कमविला त्याच देऊळगाव गाडा येथील विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेतील स्वागतकमानीवरील नावावरून आता गावात उभी फुट पडली आहे. त्यामुळे स्वागत कमानीवरील कै. झुंबर गवळी या नावाने शाळेमध्येच राजाकराण सुरु झाली असून आता शाळेचे सुशोभीकरणही चौकशीच्या भोवऱ्यात सापडले आहे.

शाळेतील उपक्रमाशील शिक्षक युवराज घोगरे यांनी लोकसहभागाच्या माध्यमातून लोकवर्गणी गोळा करून शाळेचा विकास करण्याचे काम हाती घेतले. या वर्गणीतून शाळेत विविध कामे करण्यात आली. यामध्ये शाळेचे प्रवेशद्वार, कलारंगमंच, पेव्हर ब्लॉक, सुशोभीकरण, रंगरंगोटी करणे, लॉन असे विविध कामे ही लोकसहभागातून करण्यात आली. त्या स्वागत कमानीवर कै. झुंबर गवळी यांचे नाव लिहिले गेले आहे. वास्तविक साऱ्या गावाने शाळेच्या विकासासाठी हातभार लावला असताना झुंबर गवळी यांचे नाव दिल्याने अनेक ग्रामस्थ नाराज झाले व त्यांनी या सुशोभीकरणाचीच चौकशी करावी अशी मागणी दौड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे व पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली. त्यानुसार प्रसाद यांच्या आदेशानुसार गटशिक्षणाधिकारी वणवे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिनी नेमली. समितीमध्ये इंदापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, दौंड पंचायत समितीचे केंद्रप्रमुख शिवाजी गोरे व गिरीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग इंगळे यांचा समावेश आहे.

--

चौकट

शाळेतच सुरू झाली शिवीगाळ आणि हमरीतुरी

या समितीने आज विठ्ठलवाडी शाळेस भेट दिली त्यावेळी ज्या ४१ ग्रामस्थांनी चौकशीसाठी सह्यांचे निवेदन दिले होते त्यांचा जबाब नोंदविला. यावेळी दोन्ही गटाचे पालक, ग्रामस्थ एकमेकांसमोर भिडले. याचे रूपांतरण भांडणात झाले व शाळेच्या आवारात शिव्या गाळी देत दमदाटीचे वातावरण तयार झाले. हे वातावरण काही निवळेना असे दिसल्यावर इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी पोलीसांना पाचारण केले व तणाव पूर्ण वातावरण शांत करण्यात आले व राहिलेल्या ग्रामस्थांचे जबाब नोंदविण्यात आले.

--

ज्या शिक्षकाने केला विकास त्याच्याच बदलीची मागणी

आम्ही वर्गणी दिली असून शाळेच्या प्रवेशद्वारावर सौजन्याचे नाव हे दुसऱ्या गटाच्या व्यक्तीचे तुम्ही कसे टाकू शकता, शिक्षक युवराज घोगरे यांचे मुलांच्या बाबतीत शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे मात्र हे शाळेमध्ये राजकारण करीत असून दोन गटात भांडणे लावून देण्याचे काम करीत आहेत, त्यांची तत्काळ बदली करा असे ४१ ग्रामस्थांनी जबाब नोंदविला. मात्र यावेळी एकीकडे ४१ ग्रामस्थ शाळेच्या आत जबाब नोंदवीत असताना दुसरीकडे अनेक ग्रामस्थांचा, पालकवर्ग व महिलांचा जमाव शिक्षक युवराज घोगरे यांच्या बाजूने शाळेच्या बाहेर उभा होता.

--

चौकट :

शाळेच्या प्रवेशद्वारावर कै. झुंबर गवळी यांच्या स्मरणार्थ मी दीड लाख रुपये वर्गणी दिली होती. हे सौजन्याचे दिलेले नाव हे शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या ठरावावरून देण्यात आले आहे. जर विरोधी ग्रामस्थ हे नाव काढण्याची भाषा करीत असतील तर माझे पैसे त्यांनी माघारी द्यावे. मी तेच पैसे शाळेच्या इतर विकास कामांसाठी देईल व विरोधकांनी त्यांच्या देणगीच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे नाव टाकावे यात माझी काहीही हरकत नाही.

-अजय गवळी, देणगीदार ग्रामस्थ

--

३१ खोर

फोटोओळ :हाच कमानीवरील ग्रामस्थांच्या नाववरून गावातील दोन गटात हमरीतुमरी सुरू झाली.

--

Web Title: Politics ignited in the school over credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.