महावितरणच्या देखभाल दुरूस्तीची ‘पोलखोल’

By admin | Published: August 7, 2016 04:24 AM2016-08-07T04:24:41+5:302016-08-07T04:24:41+5:30

पावसाळ्यापूर्वी शहरातील देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याच्या महावितरणच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. ही कामे करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यच महावितरणकडे

'Polkhol' for maintenance of MSEDCL | महावितरणच्या देखभाल दुरूस्तीची ‘पोलखोल’

महावितरणच्या देखभाल दुरूस्तीची ‘पोलखोल’

Next

पुणे : पावसाळ्यापूर्वी शहरातील देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याच्या महावितरणच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. ही कामे करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यच महावितरणकडे नसल्याची लेखी कबुली महावितरणने दिली आहे. तसेच या देखभाल दुरुस्तीसाठी मागविलेले साहित्य मुंबई कार्यालयाने जुलै संपल्यानंतरही पाठविले नसल्याचे माहिती अधिकारांतर्गत समोर आले आहे. त्यामुळे महावितरणने शहरात देखभाल दुरुस्ती खरंच केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून आवश्यकतेनुसार उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्राची देखभाल व दुरुस्तीची कामेर् तसेच डिस्क इन्सुलेटर बदलणे, तारा ओढणे, उपकेंद्र देखभाल, वाकलेले वीजखांब सरळ करणे, गंजलेले, तुटलेले वीजखांब बदलणे, ब्रेकर्सर्ची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, आॅईल फिल्टरेशन, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची कटाई, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजतारा बदलणे या कामांसह इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. दर वर्षी ही कामे ३१ मेअखेर पूर्ण केली जातात. या वर्षीही जूनच्या सुरुवातीलाच ही कामे सुमारे ९० टक्के झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले होते.
या संदर्भात सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे परिमंडळात तसेच विभागनिहाय देखभाल दुरुस्तीसाठी साहित्याची मागणी झाली आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्याबाबत उत्तर देताना महावितरणच्या मंडलनिहाय विभागांकडून झालेल्या मागणीनुसार, २७ मे रोजी साहित्य मागविण्यात आले होते. मात्र, अद्याप ते मिळाले नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे.

पहिल्याच पावसात उडाला होता फज्जा
शहरात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पावसाला सुरूवात झाली. मात्र, या अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या कामाने शहरात महावितरणच्या देखभाल दुरूस्तीच्या कामांचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. त्यामुळे जवळपास अर्धे शहर दोन दिवस टप्प्या टप्प्याने अंधारात होते. त्यामुळे महावितरणकडून नक्की पावसाळ्यापूर्वी कामे झाली का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, माहिती अधिकारात देण्यात आलेल्या माहितीवरून ही कामे झालीच नसल्याचे समोर येत आहे.

शहरात महावितरणचे सर्वाधिक २२ लाख ग्राहक आहेत. तर, राज्यात सर्वाधिक उत्पन्नही पुण्यातून मिळते, तसेच पुण्यात वीजचोरी व गळतीचे प्रमाणही कमी आहे. असे असतानाही पुणे विभागाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.

Web Title: 'Polkhol' for maintenance of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.