साेशल मीडियावरच घेतली जातेय जनमत चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 08:05 PM2019-03-26T20:05:27+5:302019-03-26T20:06:39+5:30
एकीकडे कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार याचे अंदाज बांधले जात असताना दुसरीकडे साेशल मीडियावर विविध पाेल्सच्या आधारे जनमत घेण्यात येत आहे. याचा फायदा राजकीय पक्षांना देखील हाेत आहे.
पुणे : लाेकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि सर्वत्र प्रचारांची रणधुमाळी सुरु झाली. 2014 च्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने साेशल मीडियाचा माेठ्या खुशाबीने वापर केला हाेता. त्याचा त्यांना चांगलाच फायदा झाला. त्यातच गेल्या पाच वर्षात झालेल्या क्रांतीमध्ये इंटरनेट आणि साेशल मीडियाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार याचे अंदाज बांधले जात असताना दुसरीकडे साेशल मीडियावर विविध पाेल्सच्या आधारे जनमत घेण्यात येत आहे. याचा फायदा राजकीय पक्षांना देखील हाेत आहे.
साेशल मीडियाचे गेल्या काही वर्षांमध्ये महत्त्व अधिक वाढले आहेत. प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून देखील साेशल मीडियाचा माेठ्याप्रमाणावर वापर केला जात आहे. भारतात तरुणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तरुणांमध्ये प्रचार करण्यासाठी साेशल मीडिया हे साेपे माध्यम आहे. साेशल मीडियात फेसबुकचा माेठा वाटा आहे. फेसबुकच्या नव्या फिचर नुसार एखाद्या विषयावर पाेल घेणे शक्य झाले आहे. या पाेलवर मतदान करता येते. यातून लाेकांची पसंती कशाला आहे, एखाद्या विषयावर त्यांची काय मते आहेत हे जाणून घेता येत आहे.
निवडणुक असल्याने काही साेशल मीडियाचा वापरकर्ते एखाद्या विशिष्ट मतदार संघातील उमेदवारांबद्दल देखील मतदान घेत आहेत. कुठला उमेदवार त्या मतदारसंघाचा विकास करु शकेल याबद्दल मतदान घेतले जात आहे. यातून लाेकांना काय वाटते हे समजून घेणे शक्य झाले आहे. या पाेलचा तरुणांकडून माेठ्याप्रमाणावर वापर करण्यात येत असून याचा फायदा राजकीय पक्षांना देखील हाेत आहे.