एकाच घरातील तब्बल २७ सदस्यांनी केले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 12:31 PM2019-04-24T12:31:32+5:302019-04-24T12:32:42+5:30

९५ वर्षांच्या पार्वतीबाई भोसले या घरातील सर्वात ज्येष्ठ मतदार आहेत. तर त्यांचा २६ वर्षीय नातु निरंजन हा घरातील सर्वात कमी वयाचा मतदार आहे.

Polling done by 27 members in one family | एकाच घरातील तब्बल २७ सदस्यांनी केले मतदान

एकाच घरातील तब्बल २७ सदस्यांनी केले मतदान

Next
ठळक मुद्देमंगळवारी त्यांनी रास्ता पेठ येथील मतदार केंद्रावर मतदान केले

पुणे : भोसले कुटूंबियांच्या तब्बल २७ सदस्यांनी मतदान करुन मतदानाचे महत्व पटवून दिले आहे. एकीकडे प्रशासनाकडून मतदारांना मतदान करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर आवाहन केले जात आहे. अशावेळी एका कुटूंबातून एकावेळी मोठ्या संख्येने करण्यात आलेले मतदान नागरिकांमध्ये जागृती होण्यास महत्वाची भूमिका बजावणार आहे. याबरोबरच एकत्रित कुटूंबपध्दतीचे महत्व त्यांनी यानिमित्ताने पटवून दिले आहे. 

९५ वर्षांच्या पार्वतीबाई भोसले या घरातील सर्वात ज्येष्ठ मतदार आहेत. तर त्यांचा २६ वर्षीय नातु निरंजन हा घरातील सर्वात कमी वयाचा मतदार आहे. मंगळवारी सकाळी या कुटूंबातील सर्व सदस्यांनी मतदान केले. आम्ही सगळे सहा भावंडे असून प्रत्येक निवडणूकीत मोठ्या उत्साहाने सर्वजण मतदान करतो. अशी भावना माजी नगरसेवक जयसिंग भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. विशेष म्हणजे आमच्या परिवारातील सर्वांनी मिळुन मतदारांमध्ये मतदानविषयक जनजागृती करण्याचे काम करतो. आमची आई सगळयात ज्येष्ठ मतदार असून ती प्रत्येक निवडणूकीत मतदान करण्याकरिता आग्रही असल्याचे भोसले यांनी सांगितले. सर्व भोसले कुटूंबीय वाड्यात एकत्रितपणे राहतात. मंगळवारी त्यांनी रास्ता पेठ येथील मतदार केंद्रावर मतदान केले. भोसले कुटूंबियांची तिसरी पिढी जागरुकपणाने एकत्रितरीत्या मतदान करीत असल्याने नागरिकांनी देखील त्यांच्या सर्व कुटूंबियांचे कौतुक केले. 

Web Title: Polling done by 27 members in one family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.