तृतीयपंथीयांचेही उत्साहात मतदान
By admin | Published: February 22, 2017 03:02 AM2017-02-22T03:02:34+5:302017-02-22T03:02:34+5:30
मतदार यादीत नाव न सापडणे, मतदान केंद्राचा योग्य पत्ता नसणे अशा अडचणी येऊनही एका
पुणे : मतदार यादीत नाव न सापडणे, मतदान केंद्राचा योग्य पत्ता नसणे अशा अडचणी येऊनही एका निर्धारातून बुधवार पेठेतील तृतीयपंथीयांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. शहरात एकूण ६७ तृतीयपंथीयांनी मतदान केल्याची नोंद आहे.
श्रीकृष्ण चित्रपटगृहाच्या परिसरात तृतीयपंथीयांची लक्षणीय वस्ती आहे. त्यांचे अनेक सामाजिक, नागरी प्रश्न असतात. आशीर्वाद संघटनेच्या अध्यक्ष बी.पन्ना यांनी या तृतीयपंथीयांची एकजूट बांधली असून, या निवडणुकीत अधिकाधिक मतदान करण्याचा निर्धार केला होता.
वेगवेगळ्या केंद्रांवर मतदान असल्याने सकाळी साडेअकरा- बारानंतर त्यांनी मतदान केले. बी. पन्ना म्हणाल्या, ‘‘मतदारयादीत नावे न सापडणे, मतदार चिठ्ठीतील नोंदीप्रमाणे नाव न आढळता भलत्याच मतदान केंद्रावर मतदान असणे असे प्रकार झाले. केंद्र शोधत आम्हाला बरेच हिंडावे लागले. मात्र आम्ही मतदानाचा हक्क
बजावलाच.’’ (प्रतिनिधी)