मतदान अधिकारी, कर्मचारी पोहोचले केंद्रावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:01+5:302021-01-16T04:14:01+5:30
आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणुका होत्या. पैकी कारेगाव, चिंचोली, भराडी, साकोरे या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित २५ ग्रामपंचायतींमध्ये ...
आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणुका होत्या. पैकी कारेगाव, चिंचोली, भराडी, साकोरे या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित २५ ग्रामपंचायतींमध्ये १७५जागांवर निवडणूक होत असून यासाठी ३६६ उमेदवार उभे आहेत. निवडणुकीसाठी ९२ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून एकूण ६६० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. हे मतदान अधिकारी केंद्रावर पोहचवण्यासाठी १२ बसेस व ६ छोट्या गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार रमा जोशी यांनी तिसरे प्रशिक्षण घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नव्याने आलेल्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना सांगितल्या. नुकत्याच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या असून, शाई डाव्या हाताच्या अनामिकेला लावण्यात तसेच कोरोनाबाधितांच्या मतदानाबाबत वेगळ्या सूचना. दिलेल्या सूचनांनुसार मतदान प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पाडण्याचे सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केले. तसेच मतदान साहित्य वितरण करण्याची व्यवस्था अतिशय नियोजनबध्द केल्याने कोणताही गोंधळ झाला नाही, असे मतदान अधिकारी व कर्मचारी नंदकुमार येवले, सुनील बुरसे, तुषार शिंदे, कपिल कांबळे, प्रदीप घोडेकर, कुमार मैड, उमेश वाडेकर या शिक्षकांनी सांगितले.
चौकट
आंबेगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने संबंधित ग्रामपंचायतील मतदारांनी लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजवावा व सदर प्रक्रियेमध्ये प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार रमा जोशी यांनी केले आहे.
फोटो : घोडेगाव येथून ग्रामपंचायत निवडणूक घेण्यासाठी सर्व साहित्य घेऊन निघालेले कर्मचारी.