सोमेश्वर, राजगडसाठी आज मतदान

By admin | Published: April 14, 2015 11:32 PM2015-04-14T23:32:12+5:302015-04-14T23:32:12+5:30

सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उद्या (दि. १५) मतदान होत आहे.

Polling for Someshwar, Rajgad today | सोमेश्वर, राजगडसाठी आज मतदान

सोमेश्वर, राजगडसाठी आज मतदान

Next

बारामती : सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उद्या (दि. १५) मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, ५३ केंद्रांवर मतदान होणार आहे. १६,३६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी वसुंधरा बारवे यांनी माहिती दिली.
कारखान्याच्या २१ जागांसाठी ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. श्री सोमेश्वर जनशक्ती पॅनलचे २१, श्री सोमेश्वर विकास पॅनलचे २१, तर १ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवीत आहे. निंबूत— खंडाळा मुरूम—वाल्हा होळ—मोरगाव कोऱ्हाळे— सुपा मांडकी —जवळार्जुन या गटांतून प्रत्येकी तीन, ब वर्ग प्रतिनिधी एक, महिला प्रतिनिधी गटातून दोन,अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी आणि भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातून प्रत्येकी एक उमेदवार निवडून द्यायचा आहे. या निवडणुकीसाठी बटन न दाबता शिक्के मारले जाणार आहेत. प्रत्येक मतदाराला ९ मतपत्रिका दिल्या जाणार आहेत. ब वर्ग प्रतिनिधी मतदारसंघासाठी, नगर परिषद शाळा क्रमांक ५, खोली क्र. १ शारदा प्रांगण, भिगवण चौक, बारामती येथे मतदार केंद्रे ठेवण्यात आली आहेत. (वार्ताहर)

४सोमेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण या चार तालुक्यांत आहे.
४प्रत्येक मतदान केंद्रावर ८ याप्रमाणे एकूण ४२४ कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
४तसेच, चारही तालुक्यांत ११ झोनल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
४अवैध मतदान रोखण्यासाठी प्रशासन पातळीवर कडक इशारे दिले आहेत.

४१७ एप्रिलला एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी २५ अधिकाऱ्यांसह २१० पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरी़क्षक सतीश शिंदे यांनी दिली.

भोर : तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्र्षिक निवडणुकीसाठी १५ तारखेला होणाऱ्या मतदानासाठी ३० मतदान केंद्रांवर प्रत्येकी ६ कर्मचाऱ्यांप्रमाणे १८० व राखीव १५ टीम, ९० कर्मचारी अशा २७० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याचे सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार राम चोबे यांनी सांगितले.
राजगडच्या निवडणुकीसाठी भोर तालुक्यातील भोर शहर, खानापूर, भोलावडे, आंबेघर, किकवी, आळंदे, सारोळे, न्हावी, कापूरव्होळ, नसरापूर या १० गावांत १८ मतदान केंद्रे आहेत. वेल्हेतील पानशेत, वेल्हे, मार्गासनी, दापोडे या चार गावांत ७ केंदे्र असून, खंडाळातील भादे, शिरवळ गावात तीन ३ केंद्रे आहेत. हवेली तालुक्यातील खेड शिवापूर येथे २ केंद्रे अशी एकूण १७ गावांत ३० मतदान केंद्रे असून, ३० मतदान टीम तयार करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)

४प्रत्येक टीममध्ये
केंद्राध्यक्ष, एक मतदान अधिकारी, ३ शिपाई व १ पोलीस असे ६ कर्मचारी नेण्यात आले आहे.
४निकाल १७ मार्चला खरेदी-विक्री संघाच्या गोडावून येथे जाहीर केला जाणार आहे.

Web Title: Polling for Someshwar, Rajgad today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.