Pune Pollution: प्रदूषणयुक्त श्वास अन् कानठळ्या बसवणारा आवाज! श्वसनाच्या त्रासाने पुणेकर बेजार

By श्रीकिशन काळे | Published: November 4, 2024 03:09 PM2024-11-04T15:09:25+5:302024-11-04T15:09:45+5:30

शहरातील हवेची गुणवत्ता दोनशे-तीनशे पार गेल्याचे निदर्शनास आले, म्हणजे अत्यंत खराब हवा

Polluted breath and deafening noise! Punekar is sick with respiratory problems | Pune Pollution: प्रदूषणयुक्त श्वास अन् कानठळ्या बसवणारा आवाज! श्वसनाच्या त्रासाने पुणेकर बेजार

Pune Pollution: प्रदूषणयुक्त श्वास अन् कानठळ्या बसवणारा आवाज! श्वसनाच्या त्रासाने पुणेकर बेजार

पुणे : शहरातील अनेक भागात यंदाची दिवाळी फटाके वाजवून दणक्यात साजरी करण्यात आली. या फटाक्यांच्या आवाजांनी कानठळ्या बसल्या आणि हवेची गुणवत्ता ढासळल्याने प्रदूषणयुक्त श्वास पुणेकरांना घ्यावा लागला. शहरातील हवेची गुणवत्ता दोनशे-तीनशे पार गेल्याचे निदर्शनास आले. त्यातून अनेकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागला.

दरवर्षीच दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी होते; परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये फटाक्यांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता चांगलीच ढासळत आहे. त्याने अनेकांना त्रास सहन करावा लागतो. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे. दमा, अस्थमा आहे त्यांच्यासाठी ही हवा धोकादायक ठरते. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम अनेकजण राबवतात. परंतु त्यातील सहभाग अजूनही कमीच आहे. पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी यंदा फटाक्यांचे स्टॉल्स लागले होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. अनेक फटाक्यांचा आवाज मर्यादेपेक्षा अधिक होता. त्यामुळे घरात बसलेल्यांनाही त्या आवाजाने कानठळ्या बसत होत्या.

काय परिणाम होतो?

शहरामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात. तसेच लहान मुले असतात. त्यांना या फटाक्यांचा प्रचंड त्रास झाला. ज्यांना श्वसनाचा आजार आहे, त्यांना तर ही प्रदूषणयुक्त हवा धोकादायक ठरते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे शहरात हवेची गुणवत्ता नोंदवली गेली. दरवर्षीच प्रदूषणाची नोंद केली जाते, मात्र त्यावर उपाययोजना काहीही होत नाहीत. फटाक्यांमधील घातक घटकांमुळे श्वसनाचा आजार होण्याचा धोका असतो.

पुणे शहरातील हवा ?

ठिकाण - १ नोव्हेंबर - २ नोव्हें - ३ नोव्हें - ४ नोव्हें
हडपसर -९५ -२५१ - २८१ - ७६

कात्रज -१७७ - १९० - १८० - ८७
भूमकर नगर- १५८ -१९० -१७४ - ७६

विद्यापीठ -१३६ -२६३ -२९८ - ७८
शिवाजीनगर : ११२ - २२९ - २५४ - ९१

कर्वेरोड -१२० -१९४ -२०९ - ७०
लोहगाव : ९९ - १३१ - १५४ - ९१

पाषाण : ८१ - १७५ -१५८ - ७६

हवेची गुणवत्ता कशी?

० ते ५० : चांगली

५० ते १०० : समाधानकारक
१०० ते २०० : चिंताजनक

२०० ते ३०० : खूपच खराब
३०० ते ४०० : धोकादायक

Web Title: Polluted breath and deafening noise! Punekar is sick with respiratory problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.