बारामतीत ‘मिनी बस’चे प्रदूषण
By admin | Published: December 19, 2015 03:04 AM2015-12-19T03:04:04+5:302015-12-19T03:04:04+5:30
शहरातील एमआयडीसी मार्गावर धावणाऱ्या मिनी एसटी बस धूर ओकताना दिसत आहेत. त्यामुळे शहराच्या प्रदूषणात भर पडत आहे. नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .
बारामती : शहरातील एमआयडीसी मार्गावर धावणाऱ्या मिनी एसटी बस धूर ओकताना दिसत आहेत. त्यामुळे शहराच्या प्रदूषणात भर पडत आहे. नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .
बारामती- एमआयडीसी मार्गावर केवळ मिनी बस धावतात. एमआयडीसीत जाणाऱ्या कामगारांसह, विद्यार्थी या बसमधून प्रवास करतात. शहरांतर्गत वाहतुकीसाठी या बस सुटसुटीत आहेत. सोयीच्या असल्याने गर्दीच्या मार्गावर या बस सहजपणे धावतात. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी उपयुक्त आहेत. या बसची प्रवासी आसनक्षमता ३२ आहे. मात्र, जवळपास ५० प्रवासी बसमधुन प्रवास करतात.
थांब्यावरदेखील या बसच्या प्रतीक्षेत गर्दी असते . मात्र, गेल्या काही दिवसांपासून या बस प्रदूषणाची तीव्र समस्या निर्माण करीत आहेत. सायलेन्सरमधून काळा धूर सोडला जात आहे. त्यातून शहराच्या प्रदूषणात वाढ होत आहे.
याबाबत आगार व्यवस्थापक रमाकांत गायकवाड यांनी सांगितले की, या मिनी बस शहरांतर्गत प्रवासी वाहतूक सुटसुटीत व्हावी यासाठी उपयुक्त आहेत. बारामतीसह केवळ राजगुरुनगर येथे या बस धावतात दोष असणारे सायलेन्सर बदललेदेखील आहेत. बिघाड असणाऱ्या बस लवकरच दुरुस्त करण्यात येतील. (प्रतिनिधी)