पुण्यात फटाके फुटण्यापूर्वीच वाढले प्रदूषण, प्रदूषण मंडळाकडून तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 02:27 AM2018-11-04T02:27:18+5:302018-11-04T02:27:42+5:30
सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर बंदी घातल्यामुळे यंदा प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. परंतु, दिवाळीपूर्वीच हवेचा गुणवत्ता निर्देशांक आरोग्यासाठी धोकादायक पातळीवर असल्याचे दर्शवत आहे.
- श्रीकिशन काळे
पुणे - सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर बंदी घातल्यामुळे यंदा प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. परंतु, दिवाळीपूर्वीच हवेचा गुणवत्ता निर्देशांक आरोग्यासाठी धोकादायक पातळीवर असल्याचे दर्शवत आहे. वातावरणातील हवेची गुणवत्ता निर्देशांक ० ते ५० पर्यंत आरोग्यास चांगला असतो; परंतु दिवाळीत ही पातळी धोक्याची मर्यांदा ओलांडते. दिवाळीपूर्वीच ही पातळी शिवाजीनगर, कर्वे रस्ता या परिसरात १६० वर पोहोचली असल्याने आताच धोक्याची घंटा वाजू लागली आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यावर भर देणे आवश्यक आहे.
न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर सुमारे १४ दिवस हवेची गुणवत्ता निर्देशांकावर देखरेख करण्यासाठी आदेश दिले आहेत. तसेच, विक्री होणाऱ्या फटाक्यांची तपासणीही करण्याचे सांगितले होते. फटाक्यांची तपासणी केली असून, १२५ डेसिबलच्या खालीच सर्व फटाके दिसून आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.
यंदा फटाके वाजविण्यास रात्री दोन तास परवानगी देण्यात आली आहे. तरीदेखील फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, दोन तासांव्यतिरिक्तही फटाके वाजविले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान आहे.
वायुप्रदूषणाची कारणे काय ?
वायुप्रदूषण हे मुख्यत्वे वाहतूक, अचल स्रोतांमध्ये होणारे इंधनाचे दहन, कोळसा, लाकूड, वाळलेले गवत यासारख्या जीवाश्म इंधनाचे जळण आणि बांधकाम यांद्वारे होते. मोटार वाहने कार्बन मोनॉक्साईड (ूङ्म), हायड्रोकार्बन्स (ऌउ) व नायट्रोजन आॅक्साईडची (ठड) उच्च पातळी निर्माण करतात. बांधकामे, खराब रस्ते व जीवाश्म इंधनांचे ज्वलन, धुळीचे कण (पार्टीक्युलेट मॅटर) प्रदूषणासाठी जबाबदार आहेत. निवासी व वाणिज्यिक कार्येदेखील वायुप्रदूषणाला हातभार लावतात.
वायुप्रदूषणाचे परिणाम कोणते ?
निकृष्ट दर्जाच्या हवेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. प्रामुख्याने, वायुप्रदूषणाचा शरीराच्या श्वसन यंत्रणेवर आणि हृदय रक्त यंत्रणेवर परिणाम होतो. जरी वायुप्रदूषणासंबंधी व्यक्तिगत प्रतिक्रिया या प्रदूषकांच्या प्रकारावर अवलंबून असल्या, तरी त्यामुळे व्यक्त होईल इतपत व्यक्तीस धोका निर्माण झाला आहे. वायुप्रदूषणामुळे दीर्घ कालीन आरोग्याच्या समस्या उद्भवतात. वायुप्रदूषणामुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्येने श्वसनक्रियेत अडचणी येणे, दमा, खोकला यासारखे श्वसन व हृदयाची स्थिती अधिक गंभीर होते.
वायुप्रदूषण कसे कमी करता येईल?
सुस्थितीत असलेली वाहने चालवून, शक्य असेल तेथे पायी चालून, सायकलचा वापर करून व सार्वजनिक प्रवासी साधनांचा वापर करून तुम्ही वायु प्रदूषण कमी करू शकता. टाकाऊ पदार्थ, केरकचरा व वाळलेले गवत व पाने जाळण्याचे थांबवा. झाडे लावा आणि पर्यावरणहिताच्या नसलेल्या उत्पादनांची खरेदी टाळा. वायुप्रदूषण कायद्यांना पाठिंबा द्या व त्यांचे पालन करा. जेथे आपण राहतो, तेथील वातावरण स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी एकमेकांना मदत करा.
प्रदूषणामुळे रक्तवाहिन्यांना आतून सूज येते. उदा.- जखम झाली, मार लागला तर जी क्रिया होत असते, ती या प्रदूषणाने होते. सर्दी, खोकला, हार्टअॅटॅक, मेंदूला झटका येणे असे प्रकार वाढले आहेत. धुळीचे कण शरीरात जात राहिले, तर त्याचा परिणाम होतो.
- डॉ. अनिरुद्ध चांदोरकर, हृदयरोगतज्ज्ञ
प्रदूषणामुळे संवेदनशील त्वचा असणाºयांना अधिक त्रास होतो. खाज येऊ शकते, त्वचा लाल पडू शकते, थंडी असल्याने ड्रायनेस येऊ शकतो. फटाके वाजविल्याने त्वचा भाजू शकते. यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. - डॉ. विकास मंटोळे, त्वचाविकार तज्ज्ञ