मागणी कमी झाल्याने डाळिंब, चिक्कू आणि पपईचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:17+5:302021-03-08T04:11:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मागणी घटल्याने मार्केट यार्डात रविवार (दि.७) रोजी पपई, चिक्कू आणि डाळिंबाच्या दरात दहा ...

Pomegranate, chikku and papaya prices fell due to declining demand | मागणी कमी झाल्याने डाळिंब, चिक्कू आणि पपईचे दर उतरले

मागणी कमी झाल्याने डाळिंब, चिक्कू आणि पपईचे दर उतरले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मागणी घटल्याने मार्केट यार्डात रविवार (दि.७) रोजी पपई, चिक्कू आणि डाळिंबाच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली. तर लिंबाच्या दरात गोणीमागे ५० रुपयांनी वाढ झाली. कलिंगड, खरबूज, अननस, पेरु, स्ट्रॉबेरी, संत्रा आणि मोसंबीचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

उन्हामुळे कलिंगड आणि खरबुजाला मागणी वाढली आहे आवकही वाढली असल्याने दर स्थिर आहेत. तर पपईला मागणी घटल्याने दरामध्येही घसरण झाली आहे.

रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, मोसंबी ३० ते ३५ टन, संत्री ५० ते ६० टन, डाळिंब ३० ते ४० टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरू २०० के्रट, चिक्कू अडीच ते तीन हजार गोणी, खरबुजाची १५ ते २० टेम्पो, स्ट्रॉबेरी ४ ते ६ टन, द्राक्षे ३० ते ३५ टन इतकी आवक झाली.

--

फुलबाजार

उन्हाळ्यामुळे विविध फुलांची आवक घटली असून शिवरात्री निमित्त फुलांची मागणी वाढल्याने बहुतांश फुलांच्या दरात वाढ झाली होती.

प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे

झेंडू ४०-४५, गुलछडी १५०-२००, बिजली २०-३०, कापरी २०४०, सुट्टा कागडा ५००-६००, शेवंती ८०-१००, मोगरा ५००-७००, ॲस्टर (चार गड्डीचे दर) १४-१८, सुट्टा (किलो) १००-१२०, गुलाबगड्डी (बारा नगाचे दर) २०-२०, ग्लॅडिएटर ४०-५०, गुलछडी काडी-५०-८०, डच गुलाब (२० नग) ८०-१२०, लिलिंबडल (५० काडी) ८-१०, अबोली लड-२००, जर्बेरा १०-२०, कार्नेशन १२०-१४०.

Web Title: Pomegranate, chikku and papaya prices fell due to declining demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.