डाळिंब महागले; लिंबाच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:53+5:302021-09-13T04:09:53+5:30

गेल्या आठवड्याच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली तर लिंबाच्या दरात गोणीमागे १०० रुपयांनी आणि कलिंगडाच्या दरात किलोमागे ...

Pomegranates are expensive; The fall in the price of lemons | डाळिंब महागले; लिंबाच्या दरात घसरण

डाळिंब महागले; लिंबाच्या दरात घसरण

Next

गेल्या आठवड्याच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली तर लिंबाच्या दरात गोणीमागे १०० रुपयांनी आणि कलिंगडाच्या दरात किलोमागे ३ रुपयांनी घट झाली़ मार्केट यार्डातील फळ बाजारात कलिंगड १० ते १२ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, अननस ३ ट्रक, मोसंबी ५० ते ६० टन, संत्री २५ ते ३० टन, डाळिंब ३५ ते ४० टन लिंबे २ ते अडीच हजार गोणी, पेरू ८०० क्रेट, चिक्कू २ हजार बॉक्स इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे - लिंबे (प्रति गोणी) : २००-५००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १००-२५०, ( ४ डझन ) : ८० ते १६०, संत्रा : (१० किलो) : १००-६५०, डाळिंब (प्रति किलो) : भगवा : ३०-१५०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १५-२०, पपई : १-२०, चिक्कू ( १० किलो) १००-५५०, पेरू (२० किलो) : २५०-४००़

-----------

Web Title: Pomegranates are expensive; The fall in the price of lemons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.