पोंदेवाडी सरपंचांना मिळाले अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:39+5:302021-03-13T04:21:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अवसरी : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल किसन वाळुंज यांना तिसरे अपत्य असल्याचे कारण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अवसरी : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल किसन वाळुंज यांना तिसरे अपत्य असल्याचे कारण देत अपात्र ठरवलेला जिल्हाधिकार्यांचा निर्णय रद्द करत पुन्हा सुनावणी घेऊन सर्व बाबींची सखोल पडताळणी करुन गुणवत्तेवर निर्णय घ्यावा असा आदेश अतिरिक्त विभागिय आयुक्त डॉ. अमोल रामोड यांनी दिल्याने अनिल वाळुंज यांना दिलासा मिळाल्याने त्यांच्या सरपंचपदाला अभय मिळाले आहे.
येथील ग्रामपंचायतीच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनिल वाळुंज थेट जनतेमधुन सरपंचपदी निवडुन आले होते. परंतु तीन अपत्य असल्याच्या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी यांच्याकडे २९ जानेवारी २०१९ ला याबाबत अपील करुन दाद मागीतली होती. परंतु वर्षभर कोरोनोमुळे त्यावर सुनावणी झाली नाही. त्या अपीलावर २३ फेब्रुवारी २०२१ला सुनावणी होऊन अतिरिक्त विभागिय आयुक्त डॉ. अमोल रामोड यांनी वाळुंज यांचे अपील स्विकारुन जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रेबाबत दिलेला निर्णय रद्द करत पुन्हा सुनावणी घेऊन सर्व बाबींची सखोल पडताळणी करुन गुणवत्तेवर निर्णय घ्यावा असा आदेश दिला. त्यामुळे अनिल वाळुंज यांना दिलासा मिळुन त्यांच्या सरपंचपदाला अभय मिळाले आहे.
छायाचित्र:
अनिल किसन वाळुंज