पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:12 AM2021-02-15T04:12:12+5:302021-02-15T04:12:12+5:30

हडपसर : पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र या गोष्टीचे राजकारण ...

Pooja Chavan's suicide will be thoroughly investigated and action will be taken against the culprits | पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होणार

पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होणार

Next

हडपसर : पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र या गोष्टीचे राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही दिली आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आमदार रोहित पवार यांनी आज मांजरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

‘कठीण काळातही शेतकरी अन्नधान्य पिकवतात आणि आपल्या देशाला त्याचा पुरवठा करतात. त्यामुळे फक्त आजचाच दिवस नाही तर वर्षाचे ३६५ दिवस आपण शेतकऱ्यांच्या ऋणात राहिला हवं, असं मला वाटतं आणि म्हणूनच मी आज इथे आलो,’ असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कारण या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांचं नाव आलं असून हेच मंत्री सदर तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून जे सत्य आहे ते समोर येईल, मात्र पूजा चव्हाण यांच्या कुटुंबावर अन्याय होता कामा नये. या प्रकरणाला एखादी व्यक्ती कितीही मोठी असेल तरीही जर ती या प्रकरणात जबाबदार असेल तरीही त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल,' असं म्हणत या प्रकरणात रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली.

Web Title: Pooja Chavan's suicide will be thoroughly investigated and action will be taken against the culprits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.