पूजा यांना अटक करून कठोर कारवाई करावी; खेडकर आणि कुटुंबियांच्या विरोधात पुण्यात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 18:00 IST2024-07-15T17:58:10+5:302024-07-15T18:00:19+5:30
-अपंग आणि NCL प्रमाणपत्र देणाऱ्या नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल व महसूल प्रांत कार्यालयाची चौकशी करावी -नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र देताना इनकम टॅक्स रिटर्न भरला असेल त्याची पडताळणी बंधनकारक करावी

पूजा यांना अटक करून कठोर कारवाई करावी; खेडकर आणि कुटुंबियांच्या विरोधात पुण्यात आंदोलन
पुणे/धनकवडी : वादग्रस्त प्रोबेशनरी आयएमएस अधिकरी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अनेक कारनामे उघड होत असताना आता या संदर्भात पुण्यातील सामाजिक संस्था देखील आक्रमक झाल्या असून जागरूक पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत. जागरुक पुणेकरांच्या वतीने सोमवारी (दि.१५) सकाळी वादग्रस्त प्रोबेशनरी आय एम एस अधिकरी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने केल्या जाणाऱ्या दडपशाही विरुद्ध बिबवेवाडी येथील महेश सोसायटी चौकात जोरदार घोषणाबाजीसह, भिक मांगो आंदोलन करण्यात आले .
यावेळी शेतकऱ्यांना पिस्तुल दाखविणाऱ्या तसेच पत्रकारांवर पण अरेरावी आणि उर्मटपणा दाखविणाऱ्या पुजा खेडकर आणि कुटुंबीयांच्या चुकीच्या प्रवृत्तीला आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा जाहिर निषेध देखील व्यक्त करण्यात आला.
यावेळी मराठा महासंघ पुणे शहर राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, नामदेव मानकर, संतोष आतकरे, राजेंद्र कुंजीर, अशोक साळेकर, आबा बाबर, रमेश बिबवे, पंढरीनाथ पासलकर, कुलदिप पासलकर, कोमल पासलकर, माऊली मरगळे, दत्ता मरगळे, धडवली ग्रामस्थ तालुका मुळशी तसेच पासलकर परिवार यांच्या सह पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भूमाताचे डॉ बुधाजीराव मुळीक, विजय कुंभार उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे म्हणाले, भूमिपुत्र शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत करणाऱ्या खेडकरांना अटक करून कठोर कारवाई करावी, नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र देताना इनकम टॅक्स रिटर्न भरला असेल त्याची पडताळणी बंधनकारक करावी. अपंग आणि NCL प्रमाणपत्र देणाऱ्या नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल व महसूल प्रांत कार्यालयाची चौकशी करावी अशी मागणी केली.