पुण्याचा ओंकार साळुंके अव्वल

By admin | Published: June 26, 2017 03:59 AM2017-06-26T03:59:25+5:302017-06-26T03:59:25+5:30

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पुरस्कृत महाराष्ट्र राज्य वरिष्ठ मैदानी स्पर्धेत रविवारी भर पावसात शिवछत्रपती क्रीडानगरीमधील ट्रॅकला

Poona Onkar Salunke Top | पुण्याचा ओंकार साळुंके अव्वल

पुण्याचा ओंकार साळुंके अव्वल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पुरस्कृत महाराष्ट्र राज्य वरिष्ठ मैदानी स्पर्धेत रविवारी भर पावसात शिवछत्रपती क्रीडानगरीमधील ट्रॅकला ५० फेऱ्या मारताना पुण्याच्या ओंकार साळुंकेने पुरुषांची २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत १ तास ४० मिनिटे १२ सेकंदात पार करून सुवर्णपदकाचा मान मिळविला.
महिला गटातील २० किलो मीटर चालण्याच्या शर्यतीत वाशिमच्या रोशनी भालेराव हिने बाजी मारली. तिने २ तास १२ मि. १६ सेकंदात पार करून विजेतेपद संपादले. सकाळपासून दुपारपर्यंत पडलेल्या संततधारेमध्ये खेळाडूंबरोबर तांत्रिक अधिकाऱ्यांचीही कसोटी लागली. विशेषत: चालणे प्रकार व हातोडा
फेकमध्ये खेळाडूंना पावसाचा मोठा त्रास झाला.
पुरुष २०० मीटर धावणे : प्रतीक निनावे : (पुणे : २२.१ सेकंद), स्वप्नील मानकर : (मुंबई शहर : २२.३), किरण डोईफोडे : (सातारा : २२.५); ४०० मीटर धावणे : कृष्णा पाटील : (कोल्हापूर : ५५.६ सेकंद), उमेशकुमार जैन : (नांदेड : ५६.१), दर्शन देवरुखकर : (ठाणे : ५६.३); ३००० मीटर स्टीपल चेस : कयाम शेख : (पुणे : ९.३६.९२ सेकंद), सचिन घोटे : (सांगली : ९.४१.६१), आशिष सकपाळ : (अमरावती : १०.००.२४); उंच उडी : उन्नी रेणू : एएसआय एमएए : २.०१ मीटर., श्रीनिश सी : एएसआय एमएए : १.९८, संतोष माळी : (सांगली : १.९०), समाधान डोमजे : (नाशिक : १.९०); पोलव्हॉल्ट : गणेश जाधव : (पुणे : ३४० मीटर), सागर साबळे : (अ. नगर : ३.४०), विक्रम पाटील : (पुणे : ३.१० मी.); थाळी फेक : हरिंदर : एमएए : ४९.२० मीटर., गोविंदकुमार राय : (नाशिक : ४७.२४ मी.), अनिल कुमार : (पुणे : ४६.७९); हातोडा : रंजन खाडे : (पुणे : ४४.५२ मीटर), दिनेश गावडे : (पुणे : ४३.६९), भूषण चित्ते : (नंदुरबार : ४६.७९); डिकेथ लॉन : गुरप्रित सिंग : एमएए : ६०.७६ गुण, निखिल कदम : (मुंबई शहर : ५५.२८), सुभाष बेनके : (मुंबई शहर : ५५.२८); २० किमी चालणे : ओंकार साळुंके : (पुणे : १ तास ४०.१२ मिनिटे), आनंद : एमएए : १.४१.२२., ओंकार कदम : (मुंबई उपनगर : २.१३.४१);
४१०००० मीटर धावणे : रणजित पटेल : (नाशिक : ३० मिनिटे ५१.९ सेकंद), शुभम मेश्राम : (अ.नगर : ३२.३१.३), हेमंत गावीत : (अकोला : ३३.०६.९); महिला २०० मीटर धावणे : चैत्राली गुजर : (सातारा : २५.० सेकंद), अक्षया अय्यर : (ठाणे : २५.३), ममता हुलके : (मुंबई उपनगर : २५.७); ४०० मीटर : संजना लहामगे : (मुंबई शहर : ६५.९ सेकंद), निर्धा सिंग : (ठाणे : ६७.५), वैष्णवी यादव : (सातारा : ६७.७); ३००० मीटर स्टीपलचेस : प्रियांका चवटकर : (पुणे : ११ मिनिटे २३.२ सेकंद), वर्षा भवानी : (मुंबई शहर : ११.२६.४), कोमल जगदाळे : (सोलापूर : ११.४३.५);
४पोलव्हॉल्ट : निकिता काळे : (अ.नगर : २.७० मीटर)., शुभांगी थोरात : (अ.नगर : २.४०), ऐश्वर्या कल्याणकर : (अ.नगर : १.९०); हातोडा फेक : सोनिया शिंदे : (पुणे : ५२.७० मीटर), स्नेहा जाधव : (सातारा : ४५.७३), प्राजक्ता भोसले : (पुणे : ३९.५६); महिला २० किमी चालणे : रोशनी भालेराव : (वाशिम : २ तास १८.१६ मिनिटे): मयूरी बबन : (अ.नगर : २ तास २४.२०), सुचित्रा काळोखे : (कोल्हापूर : २.२५.३३); हेप्टेथलॉन : स्नेहा पाटील : (सांगली : १८.५८ गुण), प्रतीक्षा मुसमाडे : (अ.नगर : १३.५६), गायत्री दळवी : (अ.नगर : १२.१९).

Web Title: Poona Onkar Salunke Top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.