आलेगाव पागा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:09 AM2020-12-08T04:09:43+5:302020-12-08T04:09:43+5:30
आलेगाव पागा हा मुख्य रस्ता असल्याने वर्दळ नेहमीच पहायला मिळते. ऊसाच्या ट्रॅक्टरची या मार्गावरुन वाहतूक होत असते. गेल्या वर्षी ...
आलेगाव पागा हा मुख्य रस्ता असल्याने वर्दळ नेहमीच पहायला मिळते. ऊसाच्या ट्रॅक्टरची या मार्गावरुन वाहतूक होत असते. गेल्या वर्षी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपासून या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी तर रस्त्याच्या साईडपट्ट्याच गायब झाल्या आहेत. बेनके नगर परिसरामध्ये डांबरी रस्ता पूर्णपणे उखडला आहे. याशिवाय अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता रस्ते खोदाई करून शेतीस पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन टाकली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रस्ता खचून मोठे खड्डे पडलेले आहे. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे वाढल्यामुळे समोरून येणारे वाहन दिसल्यामुळे अपघातही घडले आहे त्यामुळे या भागातील रस्ते दुरुस्त करून साईट पट्ट्या भरून काटेरी झुडपे काढण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.
फोटो
०७ रांजणगाव सांडस