मंचरमधील अंगणवाडीची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:08 AM2021-07-11T04:08:38+5:302021-07-11T04:08:38+5:30
यावेळी संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, सुशांत थोरात, गणेश बाणखेले, सोमनाथ फल्ले उपस्थित होते. शहराध्यक्ष नवनाथ थोरात यांनी याबाबत मंचर ...
यावेळी संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, सुशांत थोरात, गणेश बाणखेले, सोमनाथ फल्ले उपस्थित होते.
शहराध्यक्ष नवनाथ थोरात यांनी याबाबत मंचर ग्रामपंचाय, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना केलेला पत्रव्यवहार सादर करून वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यालाही मंचर ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्षित केल्याचे सांगितले आहे. अंगणवाडीची त्वरित दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा भाजप मंचर शहर पदाधिकारी यांनी दिला आहे.
याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी प्रीतम बारभुवन यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, मंचर ग्रामपंचायतला सदर क्र.१ च्या अंगणवाडीसाठी १ लाखाचा निधी वर्ग होऊन १ वर्षा पेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मंचर ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अंगणवाडी दुरुस्तीबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले तर मंचरचे उपसरपंच युवराज बाणखेले म्हणाले, अंगणवाडी दुरुस्तीसाठी सन २०१७-१८ या वर्षात एक लाख रुपयांचा निधी आला होता. मात्र त्यावेळी सत्तेवर असणाऱ्या मंडळींनी हा निधी अंगणवाडी दुरुस्तीवर खर्च न करता इतरत्र केला आहे. आम्ही पदभार स्वीकारून पाच महिने झाले आहेत. सदर अंगणवाडी दुरुस्तीसाठी एक लाख रुपये निधी मंजूर करून टेंडर काढून कामाची वर्क ऑर्डर काढली आहे. लवकरच दुरुस्तीचे काम सुरू होईल.