देगाव- नायगाव- कांबरे रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:15 AM2021-09-17T04:15:06+5:302021-09-17T04:15:06+5:30
शासनाच्या वतीने पंतप्रधान सडक योजनेमध्ये या गावांना जोडणारा डांबरी रस्ता कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आला होता. मात्र, तेथील ...
शासनाच्या वतीने पंतप्रधान सडक योजनेमध्ये या गावांना जोडणारा डांबरी रस्ता कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आला होता. मात्र, तेथील रस्त्यावर डांबराचा एक तुकडा मिळत नसून येथे रस्ता झाला होता हे सांगून लोकांचा विश्वास बसणार नाही. पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेमध्ये बनवलेल्या रस्त्याची आज अशी अवस्था आहे की, दुचाकी या रस्त्यावरून धड चालवता येत तर कधी घसरून अपघात होईल याचा नेम नाही. केवळ तीन-चार किलोमीटरचा प्रवास करणे म्हणजे दिव्यच म्हणावे लागते आहे.
दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. वाहनदुरुस्ती व इंधन खर्च यात भर पडत असून, रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब यादव यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
१६ नसरापूर
देगाव,नायगाव व कांबरे या गावांना जोडणारा डांबरी रस्त्याची झालेली दुरवस्था.
160921\img-20210912-wa0022.jpg
???? ???? ? ?? : ??? ??????????? ?????,?????? ? ?????? ?? ??????? ??????? ?????? ????????? ????????? ???? ???.