माळेगावमध्ये अंतर्गत रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:31+5:302021-09-13T04:09:31+5:30
नगरपंचायत माळेगावच्या वॉर्ड क्रमांक २ मधील सर्वात विकसित भाग मानला जातो. अमरसिंह कॉलनी, विद्यानगर, नागेश्वर नगर, मुक्तीनगर हा ...
नगरपंचायत माळेगावच्या वॉर्ड क्रमांक २ मधील सर्वात विकसित भाग मानला जातो. अमरसिंह कॉलनी, विद्यानगर, नागेश्वर नगर, मुक्तीनगर हा भाग विकसित असून या भागात अनेक ठिकाणी चांगले रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र, अमरसिंह कॉलनी जवळपास असलेल्या भागात वेगाने नागरीकरण होत आहे.या भागात राहणाऱ्या लोकांना रस्त्यावर दलदल झाल्याने चिखलातून वाट काढत जावे लागते.तर अनेक ज्येष्ठ नागरिक घसरून पडले आहेत. तर कित्येकदा दुचाकी घसरून अपघात घडले आहेत. माळेगाव नगरपंचायत जाहीर होण्यापूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात होती वार्डातील सदस्यांचे आपसातील वादांमुळेच विकासकामांसाठी आलेला निधी पळवण्याचे प्रकार घडल्यानेच आमच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे रहिवाशांनी गंभीर आरोप केले, लवकरात लवकर आमच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचे नागरिकांनी सांगितले
माळेगाव नगरपंचायत निर्माण झाली आहे. विकासासाठी निधी असताना प्रशासनाने रस्ते त्वरित करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
- मदन खिलारे- ग्रामस्थ
माळेगाव येथील अमरसिंह कॉलनीतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
१२०९२०२१-बारामती-११