नायगाव रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:08 AM2021-07-22T04:08:45+5:302021-07-22T04:08:45+5:30
तव पुनर्वसन ते नायगाव हा रस्ता तालुक्याला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावरून नायगाव लोंढे पट्टा, ढेंबरेवस्ती, कदमवस्ती, आंब्रुळेवस्ती ...
तव पुनर्वसन ते नायगाव हा रस्ता तालुक्याला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावरून नायगाव लोंढे पट्टा, ढेंबरेवस्ती, कदमवस्ती, आंब्रुळेवस्ती या भागातून दौंड कडे नागरिक या रस्त्यावरूनच प्रवास करत असतात. परंतु गेले दहा दिवस सतत कोसळणारा पाऊस आणि त्यातच भर म्हणून या रस्त्यावरून वाळू आणि मातीची अवैध वाहतूक होत असल्याने संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. या भागातील शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना खाद्य आणताना तसेच शेतीच्या कामासाठी शेतात जाताना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तत्काळ डागडुजी करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
२१ राजेगाव
राजेगाव वाटलूज शीवेवर असणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था.