पुणे-सोलापूर रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:09 AM2021-03-30T04:09:55+5:302021-03-30T04:09:55+5:30

यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. ४ वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अष्टविनायक गणपती विकास आराखड्यांतर्गत पुणे ...

Poor condition of Pune-Solapur road | पुणे-सोलापूर रस्त्याची दुरवस्था

पुणे-सोलापूर रस्त्याची दुरवस्था

Next

यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

४ वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अष्टविनायक गणपती विकास आराखड्यांतर्गत पुणे - सोलापूर महामार्ग ( थेऊर फाटा ) ते थेऊर गाव ते केसनंद मार्गे लोणी कंद या रस्त्यासाठी १६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करीत या रस्ताच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. या रस्त्याचे काम मे. पिसीआयएल हॅम अष्टविनायक थेऊर प्रा. लि. या कंपनी करत आहे. लोणीकंद ते कोलवडी या दरम्यानचे काम चालू असले, तरी पुणे-सोलापूर महामार्ग ( थेऊर फाटा ) ते थेऊर गाव या दरम्यानचे काम मात्र अद्यापही सुरु झालेले नाही.

पुणे - सोलापूर महमार्गावरून थेऊर, कोलवडी गावात ये - जा करणाऱ्या नागरिकांना तर रोजच या त्रासास सामोरे जावे लागते आहे. या रस्त्यावर खड्डे असल्याने परिसरात २४ तास धुळीचे साम्राज्य असते. यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी व या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी या रस्त्याचे लवकर काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी या रस्त्यावरून दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालक, श्रीगणेशभक्त आणी स्थानिक नागरिकांची केली आहे.

मिलिंद बारभाई ( सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ) या रस्त्यालगतच्या ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी रस्तारुंदीकरणाला विरोध दर्शविण्याबरोबरच, रस्ता रुंदी करण्याच्या विरोधात उच्च न्यायालायात याचिका दाखल करुन स्थगिती दिली आहे. यामुळे रस्त्याचे काम काही महिणन्यापासून बंद पडलेले आहे. बांधकाम विभागानेही उच्च न्यायालयात योग्य ती बाजू मांडून रस्त्याचे काम सुरु करण्यास परवानगी मागितलेली आहे.

--

कोट ---शेतकऱ्यांनी रस्तारुंदीकरणाबाबत उच्च न्यायालायमार्फत याचिका दाखल करून स्थगिती दिल्याने, सध्या तरी रस्ता रुंदीकरणाचे काम करणे अवघड आहे. कोलवडी ते केसनंद मार्गे लोणीकंद या रस्तारुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेऊन, या रस्त्याच्या रुंदीकरणाऐवजी आहे, सध्या त्याच रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी बैठक बोलवणार आहे. शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून पुढील तीन ते चार दिवसांत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील

अशोक पवार,

आमदार

--

फोटो - थेऊर (ता. हवेली ) येथील रस्त्याची झालेली दुरवस्था

Web Title: Poor condition of Pune-Solapur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.