वासुली फाटा ते मिंडेवाडी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:15 AM2021-02-17T04:15:00+5:302021-02-17T04:15:00+5:30

आंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक दोनमधील वासुली फाटा (ता. खेड) ते मिंडेवाडी शिव (ता. मावळ) या दरम्यान ...

Poor condition of Vasuli Fata to Mindewadi road | वासुली फाटा ते मिंडेवाडी रस्त्याची दुरवस्था

वासुली फाटा ते मिंडेवाडी रस्त्याची दुरवस्था

googlenewsNext

आंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक दोनमधील वासुली फाटा (ता. खेड) ते मिंडेवाडी शिव (ता. मावळ) या दरम्यान असणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरण करण्याची मागणी एमआयडीसीच्या चिंचवड येथील प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र शिंदे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे.

वासुली आणि शिंदे गावही एमआयडीसीमधील दोन्ही महत्त्वाची गावे आहेत. तसेच मावळ तालुक्यातील मिंडेवाडी या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने अवजड वाहतूक सुरू असते. २००७-०८ च्या दरम्यान आलेल्या डाऊ केमिकल कंपनीसाठी त्यावेळी हा रस्ता दुरुस्त करण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्याची कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी तर चार ते पाच फूट व्यासाचे खड्डे पडले आहेत. याशिवाय रस्ता क्रॉस करताना अनेक ठिकाणी केबल आणि पाइपलाइनसाठी रस्ता खोदला असल्याने खड्ड्यात आणखी भर पडली आहे.

या मार्गावरील खड्डे डांबराने भरण्यात आले होते, मात्र कामाचा दर्जा चांगला नसल्याने हे खड्डे काही महिन्यांमध्ये उखडले आहेत. खड्डे उखडल्याने खडी रस्त्यावर आली आहे यामुळे दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. दुचाकी पंक्चर होणे, खडीवरून घसरून अपघात होणे, अवजड वाहनांच्या टायरखाली दगड आल्यावर ते वेगाने उडून रस्त्याशेजारील व्यक्तींना लागणे असे प्रकार घडत आहेत. यासाठी लवकरात लवकर या रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरण करण्याची मागणी खेड भाजपचे उपाध्यक्ष सुनील देवकर, दत्तात्रय टेमगिरे, नीलेश पानमंद, अंकुश घनवट, सुरेश घनवट, श्रीकांत गायकवाड, संकेत पानमंद यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

वासुली फाटा ते मिंडेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर पडलेले खड्डे

Web Title: Poor condition of Vasuli Fata to Mindewadi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.