वाडा घोडेगाव रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:14 AM2021-08-12T04:14:41+5:302021-08-12T04:14:41+5:30
या रस्त्याची खडी उखडली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यात पाणी साचते. त्यामुळे वाहनांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज ...
या रस्त्याची खडी उखडली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यात पाणी साचते. त्यामुळे वाहनांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही व त्यामुळे खड्ड्यात गाड्या आदळून अपघात होतात. रस्त्याच्या साईडपट्ट्या खराब झाल्या आहेत. एक वाहन आले तर दुसऱ्या वाहनाला रस्त्याच्या खाली उतरताना गाडी रस्त्यावर घासली जाते अनेका तर गाडी रस्त्याच्या कडेलाही घेता येत नाही इतक्या साईडपट्ट्या खराब झाल्या आहेत. रस्त्याला अनेक ठिकाणी पावसामुळे खड्डे पडले आहे. डांबराचा अंश देखील रस्त्यावर दिसत नाही, रस्ता पूर्ण खडीमय झाला आहे. तीव्र उताराच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुमळे या रस्त्यावरून जाताना प्रवाशांना अक्षरश: कसरत करावी लागेत. वाडा, ढाकणे, घोडेगाव मार्गे मंचर येथे जाण्यासाठी हा सर्वात नजीकचा मार्ग आहे. व्यापारी लोकांना या रस्त्याचा मोठा फायदा होता. किराणा माल, भाजी वाहतूक, घरबांधणी साहित्याची वाहतूक या मार्गाने करणे सोयीचे ठरते. मात्र अशा या दोन तालुक्यांत जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
--
फोटो : १० वाड घोडेगाव रस्ता
फोटो ओळी : वाडा घोडेगाव रस्त्याची झालेली दयनीय अवस्था.
100821\10pun_7_10082021_6.jpg
फोटो : १० वाड घोडेगाव रस्ताफोटो ओळी : वाडा घोडेगाव रस्त्याची झालेली दयनीय अवस्थ