‘पॉप्युलर बुक डेपो’चे माधव गाडगीळ यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:16 AM2021-03-13T04:16:39+5:302021-03-13T04:16:39+5:30
पुणे : पॉप्युलर बुक डेपोचे संस्थापक माधव लक्ष्मण गाडगीळ (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन ...
पुणे : पॉप्युलर बुक डेपोचे संस्थापक माधव लक्ष्मण गाडगीळ (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठाच्या जयकर ग्रंथालयात काही वर्षे नोकरी करणाऱ्या गाडगीळ यांनी पूर्वी डेक्कन बसथांब्यासमोर असलेल्या पूना कॉफी हाउसजवळ १९५४ मध्ये पॉप्युलर बुक डेपो सुरू केला. पुण्यातील सुरुवातीच्या पुस्तकांच्या दुकानांपैकी एक अशी ओळख या दालनाला मिळाली. अल्पावधीत वाचकप्रिय झालेले हे दालन १९६१ च्या पानशेत पुरात वाहून गेले. गाडगीळ यांनी नाउमेद न होता खंडुजीबाबा चौकातील नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर पुन्हा दालन थाटले.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांची विक्री आणि राज्यभर वितरण यामुळे पॉप्युलर हे नाव वाचकांसाठी ओळखीचे झाले. संगणकीकरण तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाचनसेवा असे प्रयोग पॉप्युलरने केले. ६५ वर्षांच्या सेवेनंतर २०१८ मध्ये पॉप्युलर बुक डेपो बंद झाले.
................................