पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:32 AM2020-12-04T04:32:11+5:302020-12-04T04:32:11+5:30

पुणे : अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील कार्यालये व चेअरमन, जनरल सेक्रेटरी यांच्या घरावर आज ...

Popular Front of India protests at the Collector's office | पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

Next

पुणे : अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील कार्यालये व चेअरमन, जनरल सेक्रेटरी यांच्या घरावर आज छापे घालण्यात आले. त्याच्या निषेधार्थ फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पुण्यासह देशभरातील कार्यालयावर ईडीने छापे मारल्याचे वृत्त दुपारपासून सर्वत्र पसरले. मात्र, पुण्यातील कार्यालयाबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याचे संघटनेचे महाराष्ट्र सचिव तसेच शहराध्यक्ष रझी खान यांनी सांगितले.

ईडी ही जाणून बुजून पीएफआय संघटेनेला बदनाम करत आहे. लोकशाही वाचविण्यासाठी पीएफआय काम करत असताना देशातील भाजपा सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुडबुद्धीने कारवाई करत आहे. देशातील रोजगार, शेतकरी आंदोलन या कारणावरुन लोकांचे लक्ष हटविण्यासाठी भाजपा पुरस्कुत ईडी पीएफआयवर कारवाई करीत असल्याचे रझी खान यांनी सांगितले. पुण्यात पीएफआयचे सुमारे १ हजार ४०० कार्यकर्ते असून राज्यातील कार्यकर्त्यांची संख्या ८ हजारांवर आहे. संघटना कायदेशीर व पारदर्शीपणे शिष्यवृत्तीसह विविध सामाजिक काम करीत असल्याचे फ्रंटचे सदस्य ताज सिद्दिकी यांनी सांगितले.

Web Title: Popular Front of India protests at the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.