Porsche car crash case: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील दहा आरोपींची हाेणार एकत्रित चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:33 IST2024-12-05T09:29:00+5:302024-12-05T09:33:21+5:30

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दहा आरोपींची पोलिसांकडून कारागृहात जाऊन एकत्रितपणे चौकशी केली जाणार

Porsche car crash case Joint investigation of ten accused in Kalyaninagar accident case will be held | Porsche car crash case: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील दहा आरोपींची हाेणार एकत्रित चौकशी

Porsche car crash case: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील दहा आरोपींची हाेणार एकत्रित चौकशी

पुणे : कल्याणीनगर अपघातप्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दहा आरोपींची पोलिसांकडून कारागृहात जाऊन एकत्रितपणे चौकशी केली जाणार आहे. याबाबत तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी बुधवारी (दि. ४) न्यायालयात अर्ज केला असून, विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी पोलिसांना चौकशी करण्यास परवानगी दिली आहे.

मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, आई शिवानी अगरवाल (दोघे रा. वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार करणारे अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, कारमध्ये मागे बसलेल्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वतःचे रक्ताचे नमुने देणारे आदित्य अविनाश सूद (वय ५२ वर्षे, रा. घोरपडी), आशिष मित्तल (वय ३७, रा. विमाननगर) आणि अरुणकुमार सिंग हे दहा आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नऊ आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, तर आशिष मित्तलला रक्त देण्यास सांगणाऱ्या अरुणकुमार देवनाथ सिंग याच्याविरोधात अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सर्व आरोपींच्या विरोधात एकत्रित खटला चालविला जाणार आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करण्यासाठी सात आरोपी डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना आणखी काय देणार होते? त्यांना आणखी कोणती आश्वासने दिली होती? याबाबत पोलिसांना चौकशी करायची आहे. त्यामुळे कारागृहात जाऊन सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करण्यासाठी तपास अधिकारी यांना न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी डिस्चार्ज साठी, तर आशिष मित्तल याने खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यासाठी बुधवारी न्यायालयात अर्ज केला असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी दिली.

Web Title: Porsche car crash case Joint investigation of ten accused in Kalyaninagar accident case will be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.