Porsche crash case: आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल;कल्याणीनगर अपघात प्रकरण

By नम्रता फडणीस | Published: November 25, 2024 09:16 PM2024-11-25T21:16:29+5:302024-11-25T21:16:29+5:30

Porsche crash case: आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करून कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

Porsche crash case: Filing of application for determination of charge against the accused; | Porsche crash case: आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल;कल्याणीनगर अपघात प्रकरण

Porsche crash case: आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल;कल्याणीनगर अपघात प्रकरण

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन् मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी नऊ आरोपींविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू करण्यासाठीचा अर्ज सोमवारी (दि. २५) न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करून कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात हा अर्ज केला आहे. मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, आर्इ शिवानी विशाल अगरवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार करणारे अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, कारमध्ये मागे बसलेल्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वतःचे रक्ताचे नमुने देणारे आदित्य अविनाश सूद (वय ५२ वर्षे, रा. बंगला क्रमांक ३, सोपानबाग सोसायटी, घोरपडी), आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. बेलवेडर सोसायटी, विमाननगर) यांच्यावर खटला सुरू करण्यासाठी हा अर्ज करण्यात आला आहे. तर आशिष मित्तलला रक्त देण्यास सांगणाऱ्या अरुणकुमार देवनाथ सिंग यांच्याविरोधात अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सर्व आरोपींच्या विरोधात एकत्रित खटला चालविला जाणार आहे. दरम्यान, कल्याणीनगर अपघातातील मुलाला प्रौढ ठरवून त्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर ३१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. यासह पोर्शे कार मिळण्याबाबत आणि मुलाच्या पासपोर्टबाबत दाखल केलेल्या अर्जावर देखील याच दिवशी युक्तिवाद होणार आहे.

Web Title: Porsche crash case: Filing of application for determination of charge against the accused;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.