देशभरातील शंभरहून अधिक कलाकारांनी काढले पाेट्रेट ; भांडारकर संस्थेत आयाेजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 03:27 PM2019-03-09T15:27:18+5:302019-03-09T15:29:09+5:30
पाेट्रेट आर्टिस्ट ग्रुप आणि भांडारकर संस्थेच्या विद्यमाने शिल्पकार मायकल एंजलाेच्या स्मृतिदिनानिमित्त व्यक्तिचित्रण स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते.
पुणे : पाेट्रेट आर्टिस्ट ग्रुप आणि भांडारकर संस्थेच्या विद्यमाने शिल्पकार मायकल एंजलाेच्या स्मृतिदिनानिमित्त व्यक्तिचित्रण स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या स्पर्धेत देशभरातील 18 वर्षावरील शंभरहून अधिक स्पर्धक सहभागी झाले हाेते. आजच हा कार्यक्रम मुंबई, चंदीगड, वाराणसी, नागपुर, साेलापूर, काेल्हापूर, नाशिक येथे सुद्धा पार पडला.
या स्पर्धेत कलाकारांनी हुबेहुब लाेकांचे शिल्पे तयार केली. अत्यंत रेखीव पद्धतीने ही शिल्पे तयार करण्यात आली हाेती. वेगवेगळे भाव या शिल्पांवर रेखाटण्यात आले हाेते. त्याचबराेबर व्यक्तिचित्रे सुद्धा काढण्यात आली. या स्पर्धेचे आयाेजक रवी देव म्हणाले, मायकल एंजलाेच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम पुण्यात घेण्यात आला. गेली पाच वर्षे हा कार्यक्रम मुंबईत घेण्यात येत हाेता. वर्षाेतून दाेनदा ही स्पर्धा घेतली जाते. पुण्यातील स्पर्धेत 103 कलाकार सहभागी झाले हाेते. ही स्पर्धा घेण्याचा उद्देश हा व्यक्तिचित्रण करणाऱ्या कलाकारांना संधी मिळावी. चांगले काम करणारे समाजासमाेर यावेत हा हेतू हाेता. तसेच नागरिकांनी येऊन या कलाकारांची कला पहावी, ते कसे काम करतात ते पहावे, त्यांच्याशी संवाद साधावा हा देखील उद्देश हाेता. प्रत्येक्ष शिल्प तयार कसं तयार हाेतं हे नागरिकांना आज पाहायला मिळाले.
अंतिम प्रत्यक्ष पाेट्रेट स्पर्धा 2020 च्या जानेवारी महिन्यात घेतली जाणार आहे. चित्रकार वासुदेव कामत पाेट्रेट आर्टिस्ट्स ग्रुप ग्रॅंड ट्राॅफी आणि राेख 75 हजार रुपये बक्षीस सर्वाेत्कृष्ट पाेट्रेट काढणाऱ्याला देण्यात येणार आहे. त्याचबराेबर फर्स्ट रनर अप ला 25 हजारांचे तर सेकंट रनर अप ला 15 हजार रुपयांचे पारिताेषिक देण्यात येणार आहे.