महापालिकेच्या शाळांमधील पोषण आहाराचे काम बचत गटांच्या महिलांनाच द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:22 PM2019-08-21T12:22:04+5:302019-08-21T12:23:15+5:30

अनेक तक्रारी आल्यानंतर केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी सेंट्रल किचन पध्दती राबविण्याचे खास धोरण तयार केले.

the poshan aahar work should be given to women of the bachat groups In the municipal schools | महापालिकेच्या शाळांमधील पोषण आहाराचे काम बचत गटांच्या महिलांनाच द्या

महापालिकेच्या शाळांमधील पोषण आहाराचे काम बचत गटांच्या महिलांनाच द्या

Next
ठळक मुद्देपक्षनेत्यांच्या बैठकीत सर्वपक्षांची आग्रही मागणी

पुणे : केंद्र शासनाच्या धोरणानुसार चालू शैक्षणिक वर्षांपासून शहरातील अंगणवाड्या आणि महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचन पध्दतीनुसार पोषण आहार देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. परंतु पोषण आहारासाठीच्या सेंट्रल किचन धोरणाला बचत गटांनी विरोध केला असून, यामुळे अनेक महिलांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून पोषण आहाराचे काम बचत गटांच्या महिलांनाच देण्याची आग्रही मागणी सर्व पक्षीय सदस्यांनी घेतली. 
   महिला सक्षमीकरणं आणि सबलीकरासाठी गेल्या १२  वर्षापासून स्थानिक बचतगटामार्फत अंगणवाडी, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना  पोषण आहार देण्याचे काम केले जात आहे. दरम्यानच्या काळामध्ये याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी सेंट्रल किचन पध्दती राबविण्याचे खास धोरण तयार केले.  या  धोरणाला  शहरातील महिला बचत गटाचा कडाडून विरोध असताना देखील ही टेंडर प्रक्रिया राबवली गेली. या टेंडर प्रक्रियामध्ये बचत गटाच्या नावाखाली काही कंपन्यांनी भाग घेतला. त्याला बचतगटांनी विरोध केला. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अपात्र असलेले बचत गट पात्र करुन घेतले असा आरोप नगरसेविका  प्रिया गदादे पाटील यांनी सर्वसाधारण सभेमध्ये केला. त्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी कार्यालयात बैठक घेण्याचे आदेश दिले.  
त्यानुसार महापौर कार्यालयात बैठक झाली. उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे,   शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, विरोधीपक्षनेते दिलीप बराटे, कॉग्रेसचेगटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल , नगरसेविका प्रिया गदादे पाटील, अश्श्विनी कदम , आयुक्त सौरभ राव, आदी उपस्थित होते.  शहरातील  अंगणवाडी आणि पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे काम पात्र ठरलेल्या बचत गटांना  काम दयावे, अशी आग्रही भुमिका सर्वपक्षीय नेत्यांनी मांडली. 
-------------------
चौकशी समिती पाच दिवसात अहवाल सादर करणार 
पोषण आहार  टेंडर प्रक्रिया मध्ये बचत गटाच्या नावा खाली काही कंपन्यांनी भाग घेतला. अपात्र बचत गटांना पात्र करण्याची किमया करण्यात आली आहे. याबाबत चौकशी समिती नेमुन तकारदाराची सुनावणी घेतली जाणार आहे.ही समिती पाच दिवसात अहवाल सादर करणार आहे असे महापालिकेतील अधिका-यांनी सांगितले.  
-----------------------
महापालिकेच्या आवारामध्ये आंदोलन
शालेय पोषण आहार प्रणालीमधील गैर कारभाराची चौकशी करा, अपात्र संस्थांना दिलेलेल काम त्वरीत रद्द करून या संस्थांना काळ््या यादीत टाका, संबंधित दोषी अधिका-यावर कारवाई करा, आदी मागण्यासाठी पोषण आहार सेवा संघटनेच्या वतीने मंगळवारी ज्येष्ठ कामगार नेत्या किरण मोघे यांच्या नितृत्वाखाली महापालिकेच्या आवारामध्ये आंदोलन केले. 

Web Title: the poshan aahar work should be given to women of the bachat groups In the municipal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.