भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याबाबत सकारात्मक चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:16+5:302021-06-11T04:09:16+5:30
वाल्हे गावापासून संत ज्ञानेश्वर पालखी तळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि वाल्हेपासून आंबळे, राजेवाडी, पिसर्वे, धालेवाडी, बेलसर या प्रमुख जागांवर ...
वाल्हे गावापासून संत ज्ञानेश्वर पालखी तळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि वाल्हेपासून आंबळे, राजेवाडी, पिसर्वे, धालेवाडी, बेलसर या प्रमुख जागांवर नागरिकांची होत असलेली गैरसोय व पुणे-पंढरपूर महामार्गापासून वाल्हे येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ व इतर वाड्या-वस्त्यांवर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील रेल्वे भुयारी मार्गत पावसाळ्यामध्ये साचत असलेल्या पाण्यामुळे लोकांची होत असलेली गैरसोय पाहता बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक व मध्य रेल्वेचे सदस्य, प्रवीण शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या पुणे मंडलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत गावातील पदाधिकारी व नागरिकांची बैठक बुधवार (दि.९) पुणे येथील मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयात बैठक घडवून आणली होती. याबैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
यावेळी रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त विभागीय रेल्वे मॅनेजर, सहर्ष बाजपेयी, मध्य रेल्वे डिव्हिजन इंजिनिअर नजिबउल्ला शेख, सेक्रेटरी डीआएम पुणे मिलिंद वाघोलीकर आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.
तसेच दरम्यान या बैठकीस पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक व
मध्य रेल्वे सदस्य प्रवीण शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, नायगावचे सरपंच हरिदास खेसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष संदेश पवार, आंबळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन दरेकर, प्रा.संतोष नवले आदी उपस्थित होते.