पुण्यात तिसऱ्या लाटेला थोपविण्याचे सकारात्मक चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:10 AM2021-07-26T04:10:40+5:302021-07-26T04:10:40+5:30
तिसऱ्या लाटेच्या बातमीला चौकटी चौकट १ :- पुण्यात तिसऱ्या लाटेला थोपविण्याचे सकारात्मक चित्र पुणे शहरात शनिवारी (दि़ २४ जुलै) ...
तिसऱ्या लाटेच्या बातमीला चौकटी
चौकट १ :-
पुण्यात तिसऱ्या लाटेला थोपविण्याचे सकारात्मक चित्र
पुणे शहरात शनिवारी (दि़ २४ जुलै) कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक कमी म्हणजे २़ ३७ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला आहे़ तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात ४़ ९८ टक्क्यांवर असलेला पॉझिटिव्हिटी रेट या आठवड्यात २़ ९८ टक्के इतका खाली आला आहे़ तसेच दैनंदिन मृत्यू हे ५ वर आले असून, यामध्ये ९९ टक्के मृत्यू हे कोरोनासह अन्य आजार असलेल्या व वय वर्षे ७० च्या पुढीलच आहेत़ सर्वात महत्वाचे म्हणजे शहरासह पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे तब्बल ९७़४ टक्के इतके झाले आहे़ आणि मृत्यूदरातही सातत्याने घट होत असून, ३० मार्च रोजी २़ ३३ टक्के असलेला मृत्यूदर आजमितीला १़ ६ टक्के इतका झाला आहे़
-------------------
चौकट २ :-
पुणे शहरासह जिल्ह्यातील स्थिती
पुणे जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट मार्च, २०२० ते डिसेंबर, २०२० या काळात कायम राहिली़ या काळात दैनंदिन रूग्णसंख्या साधारणत: ४ हजार ९३५ इतकी राहिली़ तर कोरोनाची दुसरी लाट १९ फे ब्रुवारी, १९ मे, २०२१ दरम्यान मोठ्या प्रमाणात दिसून आली़ या काळात दिवसाला साधारणत: जिल्ह्यात १२ हजार ८३६ रूग्ण आढळून येत होते़ मे महिन्यानंतर मात्र ही दुसरी लाट ओसरत गेली व आज जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्ही रेट ६़६ वरून ४़ ८ वर आला आहे़ तर पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट हा २़ ९८ वर आला आहे़
---------------------------------
तिसरी लाट गृहित धरून लसीकरणाचा वेग वाढला
शहरासह जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट गृहित धरून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला असून, आजमितीला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात साधारणत: दिवसाला ५० हजार जणांचे लसीकरण होत आहे़