किसान सभेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:10 AM2021-05-12T04:10:10+5:302021-05-12T04:10:10+5:30
यापार्श्वभूमीवर किसान सभेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत प्रांताधिकारी विक्रम चव्हाण व किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांत सोमवारी (दि. १०) सखोल व ...
यापार्श्वभूमीवर किसान सभेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत प्रांताधिकारी विक्रम चव्हाण व किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांत सोमवारी (दि. १०) सखोल व सकारात्मक चर्चा पार पडली असून, प्रांताधिकाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस, किसानसभेचे अमोद गरुड, रज्जाकभाई शेख, विकास भाईक, संतोष बबनराव मदगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, तालुक्यातील आदिवासी भागातील अंतर लक्षात घेता, स्थानिक ठिकाणी कोविड सेंटर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाडा व पाईट या ठिकाणी कोविड सेंटर चालू करण्यासाठी दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल व शक्य झाल्यास ऑक्सिजन बेडची पूर्तता करू, असे प्रांताधिकारी चव्हाण यांनी आश्वासन दिल्याचे किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.