सकारात्मक विचारातून करू शकतो नैराश्यावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:23+5:302021-06-29T04:08:23+5:30
अचानक आलेल्या बदलांमुळे मनाचे आजार होतात. म्हणजे, जादा बोलणारा माणूस शांत हाेणे, आनंदी राहणारा माणूस दु:खी राहणे, चिडचिड ...
अचानक आलेल्या बदलांमुळे मनाचे आजार होतात. म्हणजे, जादा बोलणारा माणूस शांत हाेणे, आनंदी राहणारा माणूस दु:खी राहणे, चिडचिड होणे, भावनिक होणे, जास्त झाेपणे किंवा खाणे हे बदल जर सलग दोन आठवडे आढळले तर अशा व्यक्तींना तत्काळ मनोरुग्ण किंवा मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. दुसरं असं विचारलं जातं की, नैराश्याला आपण दूर ठेवू शकतो का, सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर नकारात्मक स्वत:बद्दलचे विचार, आजूबाजूच्या वातावरणाचे विचार, भविष्याबद्दलचे विचार हे या गोष्टींमुळे नैराश्याचे प्रमाण वाढत असते. रडू येणे, उदास वाटणे, भूक न लागणे, झोप न लागणे, जास्तीचे व्यसन करणे आदी लक्षणे ही नैराश्याची आहेत. हे नैराश्य कमी करण्यासाठी चांगली जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक आहे.
अजून एक गोष्ट नेहमी विचारली जाते ती म्हणजे नैराश्यातील व्यक्तींना मदत कशी करायची किंवा कोणाला मदत करायची अथवा कोणाला नाही. केली तर ती कोणत्या प्रकाराची, असे विविध प्रश्न विचारले जातात. साधारण ज्यांना नैराश्य येते त्या वेळी त्यांच्या प्रत्येक वेळी बोलायलाय हवं असं काही नाही. त्या व्यक्तीला फक्त आपण जवळ आहोत याची जाणीव करून द्या किंवा आपण बोलू शकतो हे समजावा. बऱ्याच वेळा आपण नैराश्यात असलेल्या व्यक्तीवर बोलण्यासाठी दबाव आणतो. परंतु, त्याची मानसिक स्थिती बरी नसते. त्या वेळी असा दबाव आणणे चुकीचे आहे. त्याला केवळ आपण आहोत याची जाणीव करून द्यावी, अन्यथा गडबड होऊ शकते. थोडक्यात, ते सुरक्षित असले पाहिजे आणि आपण त्यांच्या जवळ आहोत हे सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे जिमला जाणे किंवा बाहेर एखाद्या गोष्टीत त्यांना गुंतवणे आदी करू शकतो.
सध्या एक नवीन मानसिक आजार आला आहे तो म्हणजे, सोशल ॲडिक्ट, स्क्रीन टाइम. सर्वसाधारण चिंतारोग हा सर्वत्र पाहायला मिळत असतो. अनेक जण विचार असतात की, कायमस्वरूपी गोळ्या घ्यावा लागतात का, तसे काही नाही. आजार कोणत्या स्वरूपाचा आहे त्यावर औषधे किती दिवस द्यायची हे ठरवले जाते. म्हणजे काही आजारांवर कायमस्वरूपी गोळ्या घ्यावा लागतात तर काही आजारांसाठी ठराविक काळच उपचार घ्यावे लागतात. अर्थात आजार कोणता आहे त्यावरच उपचार किती दिवस घ्यावे लागतील हे ठरवले जाते, असेही डॉ. जहागीरदार यांनी सांगितले.