मुलांमधील सकारात्मकता ठरली ऊर्जास्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:10 AM2021-05-06T04:10:08+5:302021-05-06T04:10:08+5:30

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केमिकल इंजिनिअर अमोल खराडे कोविडबाधित मित्राच्या संपर्कात आल्यानंतर, अंगात कणकण व घशात थोडी खवखव अशी सौम्य ...

Positivity in children became a source of energy | मुलांमधील सकारात्मकता ठरली ऊर्जास्रोत

मुलांमधील सकारात्मकता ठरली ऊर्जास्रोत

Next

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केमिकल इंजिनिअर अमोल खराडे कोविडबाधित मित्राच्या संपर्कात आल्यानंतर, अंगात कणकण व घशात थोडी खवखव अशी सौम्य लक्षणे दिसू लागली. खबरदारी म्हणून फॅमिली डॉक्टरांची भेट घेतली. त्यांच्या सल्ल्यानुसार, कोविड टेस्ट केली. अमोल खराडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. लगेच त्यांच्या आईवडिलांची, पत्नी व जुळ्या मुलांची व मी कोरोना टेस्ट करून घेतली. तेव्हा आई, पत्नी व एका मुलाची टेस्ट पॉझिटिव्ह आली.

सासूबाईंचे वय ६९, त्यांना उलट्यांचा त्रास, तसेच शरीराचे तापमानही वाढू लागल्यामुळे नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. याच हॉस्पिटलमधील डॉ. रिमा तांदळे यांच्या सल्ल्यानुसार, बाकी आम्ही घरी गृहविलगीकरणात गेलो. मला स्वतःला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. शरीराचे तापमानातही वाढ झाली होती. माझा एक मुलगा सेरेब्रलपाल्सीग्रस्त असल्याने त्याला सोडून मला हॉस्पिटलमध्ये राहणे शक्यच नव्हते. अर्थात, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मीही होम क्वारंटाईन झाले. डॉ. तांदळे यांनी आम्हाला धीर दिला. आहारतज्ज्ञ डॉ. सारिका सातव, बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष शिंदे यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले. असे पर्यावरणशास्त्रात एम.एस्सी असलेल्या वैशाली अमोल खराडे यांनी सांगितले.

या काळात विविध माध्यमांतून सतत दुःखदायक बातम्या येत होत्या. पण, याचा जराही परिणाम होऊ न देता मन विचलित होऊ दिले नाही. मित्रपरिवाराचे सहकार्य, माझ्या नणंद मनीषा काळभोर व मावस बहीण कोमल ह्यांनी सकस आहाराची काळजी घेतली. कोमलचे पती सामाजिक कार्यकर्ते अमित टिळेकर यांनी सतत धीर देऊन मनोबल वाढवले. अशा अनेक नातेवाईकांनी, आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी यथाशक्ती मदतच केली.

कोट

विशेष म्हणजे, घरकाम करणाऱ्या मावशींनी आर्थिक परिस्थिती नसताना एक-दोन दिवस डबा पाठवला. अशा अनेक सदिच्छांतून, मदतीमुळेच थोड्याच दिवसांत आम्ही सर्वजण सहीसलामत या संकटातून बाहेर पडलो. सेलेब्रलपाल्सीग्रस्त असलेला दुसरा मुलगा साईची तर नेहमीच आनंदीवृत्ती असते. एवढ्या लहान मुलांमध्ये संकटांना आनंदाने सामोरे जाण्याचं धैर्य आहे तर आपणच का गळाटून जायचं, खरंतर या मुलांमधील सकारात्मकताच आमचे ऊर्जास्थान झालं. - वैशाली अमोल खराडे, गृहिणी व पर्यावरणतज्ज्ञ

Web Title: Positivity in children became a source of energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.