लोकसंख्येच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी अवघी ९.९ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:11 AM2021-04-25T04:11:25+5:302021-04-25T04:11:25+5:30

पुणे : कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाल्यानंतर मार्च आणि एप्रिलमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढ झाली. या काळात ...

Positivity is only 9.9 per cent of the population | लोकसंख्येच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी अवघी ९.९ टक्के

लोकसंख्येच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी अवघी ९.९ टक्के

Next

पुणे : कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाल्यानंतर मार्च आणि एप्रिलमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढ झाली. या काळात मृत्यूचे प्रमाणही वाढत गेले. मात्र, मागील तीन दिवसांत रुग्णसंख्या कमी होत आहे. यामधून दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. पुण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत झालेली रुग्णवाढ ही ९.९ टक्के असून, बरे झालेल्यांची टक्केवारी ८.५ टक्के आहे. शनिवारी दिवसभरातील झालेल्या रुग्णवाढीचे लोकसंख्येच्या तुलनेतील प्रमाण अवघे ०.१० टक्के आहे. शहरात पुन्हा एकदा सकारात्मक चित्र निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा पुण्याला बसला आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पुण्यात आता सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. पुण्याची लोकसंख्या अंदाजे ४० लाख असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. २००१ च्या जनगणनेनुसार २४ लाख ३० हजार लोकसंख्या होती. २०११ च्या जनगणनेनुसार ३१ लाख ५० हजार लोकसंख्या नोंदविली गेली होती. लोकसंख्येत साधारणपणे ३० टक्के वाढ झाली होती. त्याच अंदाजाने २०२१ ची लोकसंख्या ४० लाखांच्या घरात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या लोकसंख्येच्या तुलनेत शनिवारी दिवसभरात झालेली ३ हजार ९९१ रुग्णांची वाढ ही अवघी ०.१० टक्के ठरली आहे. तर, आजवर ३ लाख ९५ हजार ४८६ रुग्ण पॉझिटिव्ह झाले असून ही टक्केवारी ९.९ टक्के आहे. ही टक्केवारी ९ मार्च २०२० पासून २४ एप्रिल २०२१ पर्यंतची आहे. वर्षभरात सर्वसाधारणपणे दहा टक्के लोक पॉझिटिव्ह झाले आहेत. शनिवारी दिवसभरात बरे झालेल्या ४ हजार ७८९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आजवर ३ लाख ३९ हजार ५७१ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. ही टक्केवारी अनुक्रमे ०.१२ टक्के आणि ८.५ टक्के अशी आहे. हे सकारात्मक चित्र आहे.

शहरातील रुग्णसंख्या मागील तीन दिवसांत कमी होत आहेत. यासोबतच सक्रिय रुग्णांचा आकडाही घटला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ४९ हजार ४७२ सक्रिय रूग्णांची टक्केवारीसुद्धा अवघी ०.१२ टक्के आहे. शनिवारी दिवसभरात झालेल्या मृत्यूचे (५५) प्रमाण हे ०.००१४ एवढे कमी असून, आजवरच्या मृत्यूचे (६,४४३) प्रमाण ०.१६ टक्के आहे, तर अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाण ०.१६ टक्के आहे. शनिवारी दिवसभरात २२ हजार २२७ स्वाब तपासण्या करण्यात आल्या. हे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत ०.५५ टक्के आहे.

Web Title: Positivity is only 9.9 per cent of the population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.