शहरातील कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट तीनच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:16 AM2021-08-28T04:16:01+5:302021-08-28T04:16:01+5:30
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या गेल्या चार दिवसांपासून सातत्याने अडीचशेच्या पुढेच असून या आठवड्यात शहरातील कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्क्यांच्या ...
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या गेल्या चार दिवसांपासून सातत्याने अडीचशेच्या पुढेच असून या आठवड्यात शहरातील कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्क्यांच्या पुढे गेला आहे़ आजमितीला शहरात दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ३़ ४ टक्के इतकी झाला असून, गेल्या आठवड्यात तो २़ ६७ टक्के इतका होता़
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधितांचा मृत्यूचा सरासरी आकडा या आठवड्यात हा ५ वरून ४ वर आला असून, टक्केवारी १़ ८१ वरून १़ ८० वर आली आहे़
शहरात या आठवड्यात सर्वच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कोरोनाबाधितांची वाढ दिसून आली आहे़ यामध्ये सर्वाधिक वाढही औंध-बाणेर, धनकवडी-सहकारनगर व हडपसर-मुंढवा येथे असून ती २०० च्या आसपास आहे़ तर शहरातील दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या भवानी पेठ येथे सर्वात कमी म्हणजेच २१ ने वाढ दिसली आहे़ या पाठपोठ वानवडी रामटेकडी, ढोले पाटील रोड, कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कमी रूग्णसंख्या आढळून आली आहे़
------------
गेल्या पाच आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट
२३ ते २९ जुलै : ३़ ३२ टक्के
३० जुलै ते ५ आॅगस्ट : ३़ २२ टक्के
६ ते १२ आॅगस्ट : २़ ४१ टक्के
१३ ते १९ आॅगस्ट : २़ ५८ टक्के
२० ते २६ आॅगस्ट : ३़ ४ टक्के
-----------------------