पॉझिटिव्हिटी रेट घटतोय अन‌् मृत्युदर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:05 AM2021-05-03T04:05:41+5:302021-05-03T04:05:41+5:30

सरत्या आठवड्यातील चित्र : कोरोनाची दुसरी लाट होतेय गंभीर प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एप्रिल महिन्याच्या पहिल्या ...

The positivity rate is declining and the mortality rate is increasing | पॉझिटिव्हिटी रेट घटतोय अन‌् मृत्युदर वाढतोय

पॉझिटिव्हिटी रेट घटतोय अन‌् मृत्युदर वाढतोय

Next

सरत्या आठवड्यातील चित्र : कोरोनाची दुसरी लाट होतेय गंभीर

प्रज्ञा केळकर-सिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात आजवरचा सर्वाधिक २५ टक्केइतका पॉझिटिव्हिटी रेट नोंदवला गेला होता, तर मृत्युदर ०.६३ टक्के इतका होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट घटला असला तरी मृत्युदरात वाढ झाली आहे. २५ एप्रिल ते १ मेदरम्यान २१.१६ टक्के इतका पॉझिटिव्हिटी दर, तर १.४९ टक्के मृत्यूदर पाहायला मिळाला. कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर होत असून, ११ मे ते १५ मे यादरम्यान रुग्णसंख्या उच्चांक गाठला जाईल आणि त्यानंतर लाट ओसरू लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण गंभीर होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात, बेड मिळवण्यासाठी रुग्णांची तारांबळ उडत आहे. त्यातच मृत्युदरात वाढ होत असल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण आरोग्य व्यवस्था हादरवून टाकली आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक गंभीर असल्याचे एव्हाना सिद्ध झाले आहे. वेगवान लसीकरण, नागरिकांचे योग्य वर्तन आणि आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा यातूनच दुसऱ्या लाटेवर मात करता येईल, असा विश्वास वैद्यकतज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय रुग्णांची सरासरी संख्या ४२ हजारइतकी होती. दुसऱ्या आठवड्यात सक्रिय रुग्णसंख्येत जवळपास १० हजारांनी वाढ होऊन हा आकडा ५४ हजारांपर्यंत जाऊन पोहोचला होता. तिसऱ्या आठवड्यात ५०-५२ हजार इतके सक्रिय रुग्ण होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा ४२ हजारांपर्यंत घटली आहे. सरत्या महिन्यात ८ एप्रिल रोजी ७०१० इतके सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. ९ एप्रिल रोजी महिन्यातील सर्वाधिक २७९८६ इतक्या चाचण्या झाल्या. ३० एप्रिल रोजी महिन्यातील सर्वाधिक ६५ रुग्णांचे मृत्यू झाले.

एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या वाढली होती. शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या स्थिरावली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शेवटच्या आठवड्यात चाचण्यांची संख्याही कमी झाली आहे. २५ एप्रिल ते १ मे या कालावधीत १,३२,७६१ इतक्या चाचण्या पार पडल्या.

------

चौकट १

कालावधी चाचण्या रुग्ण मृत्यू

२८ मार्च-३ एप्रिल १,२३,५९९ ३०९३२ १९६

४ - १० एप्रिल १,५७,०८८ ३९१६३ २८९

११ -१७ एप्रिल १,५९,२२१ ३७८२१ ३५६

१८ - २४ एप्रिल १,५७,०४० ३४,६८३ ३८७

२५ एप्रिल-१ मे १,३२,७६१ २८,१०१ ४२१

------

चौकट 2

कालावधी मृत्युदर पॉझिटिव्हिटी दर

२८ मार्च-३ एप्रिल १.४९ २१.१६

४ - १० एप्रिल १.११ २२.०८

११ -१७ एप्रिल ०.९४ २३.७५

१८ - २४ एप्रिल ०.७३ २४.९३

२५एप्रिल-१मे ०.६३ २५.०२

Web Title: The positivity rate is declining and the mortality rate is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.